नवी दिल्ली: युनायटेड किंगडम अर्थात UK मध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळून आल्यानंतर जगभरात पुन्हा एकदा भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. भारतासह अनेक देशांनी UK वरुन येणारी सर्व विमानसेवा रोखण्याचा निर्णय घेतला आहे. अशावेळी कोरोना विषाणूच्या नव्या प्रकाराबाबत अजून एक चिंताजनक बातमी खुद्द ब्रिटनच्या पंतप्रधानांनी दिली आहे. कोरोना विषाणूच्या नव्या प्रकाराचा फैलाव अत्यंत वेगाने होत असल्याची माहिती ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी दिली आहे. (Boris Johnson’s shocking information about a new strain of corona virus)
बोरिस जॉन्सन यांनी सोमवारी एक पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी जॉन्सन यांनी कोरोना विषाणूच्या नव्या प्रकाराबाबत भाष्य केलं. ‘ब्रिटनमध्ये आढळून आलेला कोरोना विषाणूचा नवा प्रकार एका देशातून दुसऱ्या देशात वेगाने पसरु शकतो’, अशी शक्यता त्यांनी वर्तवली आहे. दरम्यान, ब्रिटनमध्ये सध्या धान्याचा मुबलक साठा आहे. साठवणूक आणि पुरवठा यंत्रणेची साखळी मजबूत असल्याचंही जॉन्सन यांनी यावेळी सांगितलं.
बोरिस जॉन्सन यांनी 19 डिसेंबरला बोलताना विषाणूच्या या नव्या प्रकाराची प्रसार होण्याची क्षमता 70 टक्के जास्त असल्याचं म्हटलं होतं. तर ब्रिटनच्या आरोग्य विभागाचे सचिव मॅट हॅनकॉक यांनी विषाणूचा नवा प्रकार नियंत्रणाबाहेर असल्याची भीती व्यक्त केली होती.
तसंच विषाणूच्या या नव्या प्रकारात 17 महत्वाचे बदल आहे. त्यात सर्वात मोठा आणि घातक बदल म्हणजे त्यातील स्पाईक प्रोटीन. स्पाईक प्रोटीनचा वापर हा विषाणू मानवी शरिरातील कोशिकांमध्ये घुसण्यासाठी करत असल्याचं वैज्ञानिकांचं मत आहे.
कोरोनाच्या नव्या प्रजातीवर स्पुटनिक-वी ही लस प्रभावी ठरत असल्याचा दावा रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड (RDIF) चे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) किरिल दिमित्रिक यांनी केला आहे.
रशियातील स्पुटनिक या वृत्तसंस्थेने याबाबत सविस्तर वृत्त दिले आहे. या वृत्तानुसार, “ब्रिटनमध्ये आढळलेल्या कोरोनाच्या नव्या प्रजातीवर स्पुटनिक- व्ही ही लस प्रभावी आहे. कोरोना व्हायरसमध्ये म्यूटेशन्स झाले असले तरी, स्पुटनिक – व्ही लस नव्या कोरोना विषाणूविरोधात तिचा प्रभाव चांगल्या प्रकारे सिद्ध करत आहे,” असे दिमित्रिज यांनी सांगितलं. तसेच, रशियन डायरेक्ट इन्वेस्टमेंट फंड (RDIF) अॅझेनेका या कंपनीसोबतसुद्धा नव्या कोरोनाशी मुकाबला करणारी प्रभावी लस तयार करण्यावर काम करत असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.
#BREAKING | #SputnikV vaccine will not only be effective against new mutation detected in UK, but also against other mutations: RDIF CEO https://t.co/6XRuYskysI#SputnikBreaking @sputnikvaccine pic.twitter.com/oAI1jaFI3H
— Sputnik (@SputnikInt) December 21, 2020
संबंधित बातम्या:
कोरोनाचा जीवघेणा अवतार आणि त्याची संपूर्ण माहिती, स्पेशल रिपोर्ट
Boris Johnson’s shocking information about a new strain of corona virus