हावडा : ब्रिटीश साम्राज्याचा सूर्य कधी मावळत नसल्याचे म्हटले जात होते. आता राजेशाही राहिली नसली तर ब्रिटनच्या राजाला अजूनही वलय आहे. जगभरातील लोकांच्या नजरा युनायटेड किंगडम म्हणजेच ब्रिटनच्या राजघराण्याचे किंग चार्ल्स ( king Charles III ) यांच्या राज्याभिषेक सोहळ्याकडे लागल्या आहेत. पश्चिम बंगालच्या कोलकाताहून 50 किमीवर असलेल्या हुगळी जिल्ह्यातील सिंगूरच्या एका भारतीय तरूणीने या सोहळ्यासाठी राणी ( Camilla ) कॅमिला यांचा पेहराव तयार केला आहे. तिला खास आजच्या सोहळ्यासाठी आमंत्रण देखील आहे. कोण आहे ही तरूणी, तिचा कोलकाता ते बकिंगहॅम पॅलेस प्रवास पाहा.
अवघ्या 29 वर्षीय प्रियंका मल्लीक या फॅशन डीझायनरला असा आत्मविश्वास आहे की तिने तयार केलेला ब्रुच आणि ड्रेस अनुक्रमे किंग आणि क्वीन लंडनच्या वेस्टमिन्स्टर अॅबे मध्ये होणाऱ्या राज्याभिषेक सोहळ्यात परिधान केला जाईल. जेव्हा आपल्याला कळले की माझे डीझाईन राणी कॅमिला आणि किंग चार्ल्स ( तृतीय ) यांना आवडले आणि मला त्यांच्याकडून अप्रिशियन लेटर आले तेव्हा मला एकदम आकाश टेंगणे झाल्या सारखे वाटल्याचे प्रियंका मल्लिक यांनी म्हटले आहे.
बकिंगहॅम पॅलेस येथून लेटर किंवा ई-मेल येणे हे माझ्या सारख्या डिझायनरसाठी खूपच अभिमानाची गोष्ट असल्याचे प्रियंका यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना स्पष्ट केले. प्रियंका यांची क्वीन ऑफ कॉन्सोर्टद्वारा प्रशंसा करण्यात आली आहे. त्यांनी डीझाईन केलेला ब्रूच आणि ड्रेस पाहून प्रियंका यांच्या पाठीबर शाबासकी मिळाली असून त्यांची कलाकुसर खूपच चांगली असून त्यांच्या खूपच प्रतिभा असल्याचे म्हटले आहे.
आपण राणीचा ड्रेस आणि राजाचा ब्रुच देखील डीझाईन केला आहे. गेल्या सहा महिन्यांपासून राणी कॅमिला यांचा ड्रेस डीझाईनचे काम सुरू होते. माझ्या डीझाईन केलेल्या ड्रेससाठी राणीकडून प्रशंसापत्रही मिळाले आहे. त्यानंतर मी राजासाठी ब्रुच डीझाईन करण्याचा निर्णय घेतला. राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनानंतर किंग चार्ल्स तृतीय यांना लागलीच राजे म्हणून जाहीर करण्यात आले होते. परंतू त्यांचा रितसर राज्याभिषेक सोहळा आज होत आहे. त्यांना यावेळी झळाळता शाही क्राऊन ( मुकूट) परिधान करण्यात येणार आहे.