लंडन : ब्रिटनच्या राजघराण्यावर 1969 मध्ये एक माहितीपट तयार झाला, मात्र त्यावर प्रदर्शित झाल्यानंतर लगेचच बंदी आली (British Royal Family Documentary Leak). त्यामुळे ब्रिटनमध्ये (Britain) या राजघराण्यावर आधारित चांगलीच उत्सुकता निर्माण झाली होती (Royal Family). मात्र, अखेर महाराणी एलिजाबेथने II (Queen Elizabeth II) बॅन केलेला हा माहितीपट अखेर लिक झालाय (British Royal family documentary film leak banned by queen 50 years ago).
जगभरात ब्रिटीश राजघराण्याच्या या बॅन केलेल्या माहितीपटाविषयी उत्सुक होती. अखेर हा चित्रपट लिक झालाय. त्यामुळे ब्रिटीश राजघराण्याला ज्या गोष्टीची भीती होती तिच झालीय. बॅन केलेला हा चित्रपट यूट्यूबवर लिक झालाय. या माहितीपटात शेकडो वर्षांची परंपरा असलेला राजघराण्याचा शाही महाल आतून कसा दिसतो याचं चित्रीकरण आहे. हा चित्रपट सर्वात आधी बीबीसीने ऑन एअर दाखवला होता. यानंतर लाखो लोकांना या पटातील एक्सक्लुझीव माहिती समजली. मात्र, त्यानंतर लगेचच बकिंघम पॅलेसच्या आदेशानुसार हा चित्रपट 1970 मध्ये बॅन केला.
‘रॉयल फॅमिली’ माहितीपट यूट्यूबवर पोस्ट
बॅन केलेला रॉयल फॅमिली हा माहितीपट नेमका कुणी युट्यूबवर टाकला याविषयी अद्याप माहिती समजू शकलेली नाही. असं असलं तरी पोस्ट झाल्यानंतर कॉपी राईटच्या मुद्द्यावर हा माहितीपट युट्यूबवरुन हटवण्यात आला. माध्यमांमध्ये आलेल्या रिपोर्टनुसार या माहितीपटात ब्रिटनच्या महाराणीने अमेरिकेच्या राजदुतांना ‘गोरिल्ला’ म्हटलं होतं. त्या म्हणाल्या होत्या, ‘तेथे एक गोरिल्ला आहे. त्याचं शरीर आहे आणि लांब हात आहेत.’ त्यांच्या याच वक्तव्यामुळे हा माहितीपट बॅन करण्यात आल्याचं बोललं जातंय.
हेही वाचा :
‘हे’ एक नाणं तुमच्याकडे असेल तर तुम्ही कोट्यधीश होणार
अखेर ब्रिटनहून परतलेले नागरिक सापडले, शोध घेण्यासाठी घ्यावी लागली पोलिसांची मदत
Lockdown | ब्रिटननंतर जर्मनीतही लॉकडाऊन, पाहा कोणकोणत्या देशांमध्ये घोषणा
व्हिडीओ पाहा :
British Royal family documentary film leak banned by queen 50 years ago