नवी दिल्ली | 19 सप्टेंबर 2023 : खलिस्तानी चळवळीसाठी (Khalistan Movement) कॅनडा स्वर्ग ठरला आहे. त्यावरुन भारताने यापूर्वी कॅनडाचे कान टोचले होते. खलिस्तान दहशतवादी हरदीप सिंग निज्जर याची हत्या नुकतीच झाली. त्याच्या हत्येवरुन दोन्ही देशांमध्ये वाद पेटला आहे. ही हत्या भारताने घडवून आणल्याचा गंभीर आरोप कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो (PM Justin Trudeau) यांनी केला आहे. निज्जर अनेक दिवसांपासून कॅनेडात आश्रयाला होता. ब्रिटिश कोलंबियात त्याची हत्या झाली होती. सुरक्षा एजन्सीज या हत्येमागे एखाद्या बाहेरील शक्तीचा हात होता का, याची पुष्टी करत आहे, कॅनडाच्या धरतीवर असा हल्ला सहन करणार नसल्याचे त्यांनी सांगितले. भारताच्या परराष्ट्रमंत्रालयाने या वृत्ताचे खंडन केले आहे.
BREAKING: Trudeau’s statement regarding allegations of India’s involvement in killing of Sikh leader in Canada pic.twitter.com/ECmwQqnkNY
हे सुद्धा वाचा— The Spectator Index (@spectatorindex) September 18, 2023
कोण आहे निज्जर
खलिस्तानी टायगर फोर्स-KTF या दहशतवादी संघटनेचा हरदीप सिंग निज्जर प्रमुख होता. तो मुळचा पंजाबमधील आहे. जालंधरजवळील भारसिंघपूर या गावचा तो रहिवाशी आहे. राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) दोन वर्षांपूर्वी त्याच्यावर खलिस्तानी चळवळीला मदत करत असल्याबद्दल आणि फुटीरतावादी कार्यात सहभागाबद्दल त्याच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले होते. त्याने 2021 मध्ये एका हिंदू पुजाऱ्यावर हल्ला केला होता. त्याच्यावर 10 लाख रुपयांचे बक्षिस होते. बंदी घातलेल्या शिख्स फॉर जस्टिस या संघटनेतही तो सक्रिय होता. शिख तरुणांची माथी भडकवण्यासाठी तो काम करत होता. केंद्रीय गृहमंत्रालयाने 2019 मध्ये या संघटनेवर बंदी घातली आहे. कॅनडातील ब्रिटिश कोलंबिया भागात राहत असल्याची पुष्टी झाली होती. जूनमध्ये त्याची हत्या करण्यात आली होती.
“India rejects allegations by Canada,” MEA issues statement.
“We have seen and reject the statement of the Canadian Prime Minister in their Parliament, as also the statement by their Foreign Minister. Allegations of Government of India’s involvement in any act of violence in… pic.twitter.com/RmH8eFDinR
— ANI (@ANI) September 19, 2023
परराष्ट्र मंत्रालयाने फेटाळले आरोप
दहशतवादी हरदीप निज्जर याच्या हत्येमागे भारत असल्याचा गंभीर आरोप कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रूडो यांनी केला. त्यावरुन दोन्ही देशात संबंध ताणल्या गेले आहेत. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने तातडीने या आरोपांचे खंडण केले. कॅनडात खलिस्तानी दहशतवाद्यांचे स्तोम माजले आहे. त्यावरुन लक्ष विचलीत करण्यासाठी हा प्रयत्न होत असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले.
काही भागात शिख समुदायाचे प्राबल्य
कॅनडामध्ये नोकरी, व्यवसायानिमित्त लाखो शिख स्थायिक झाले आहेत. 8,00,0000 लाख शिख या देशात गुण्यागोविंदाने राहतात. टोरंटो आणि आजूबाजूच्या परिसरात त्यांचे प्राबल्य आहे. पण त्यातील काहींनी खलिस्तान चळवळीचा झेंडा हाती घेतला आहे. कॅनडातून भारतीय भूमीवर दहशतवादी कारवायात त्यांचा सहभाग उघड झाला आहे. या चळवळीला तिथल्या सत्ताधाऱ्यांचे पण समर्थन असल्याचे समोर आल्यानंतर भारताने कॅनडावर तिखट प्रतिक्रिया दिली होती.