नवी दिल्ली: भारत आणि चीनच्या सैन्यादरम्यान 2020 च्या जून महिन्यातील गलवान खोऱ्यामध्ये झटापट झाली होती. यामध्ये भारताचे 20 जवान शहीद झाले होते. तर, चीननं काही दिवसांपूर्वी त्यांचे 4 जवान मारले गेल्याचं मान्य केलं होते. दोन्ही देशांमधील तणाव वाढल्यानंतर चर्चेच्या फेऱ्या सुरु करण्यात आल्या होत्या. दोन्ही देशांच्या लष्करी अधिकाऱ्यांमध्ये चर्चा सुरु असताना चीनच्या माध्यमांमध्ये भारतीय सैनिकांवर आरोप करणारा कथित व्हिडीओ जारी करण्यात आला आहे.यामध्ये भारताचं सैन्य चीनच्या हद्दीत घुसल्याचा दावा करण्यात आलाय. (China released Galwan Valley India China face off border site video)
चीनमधील सरकारी माध्यमांनी जारी केलेला व्हिडीओ गलवान खोऱ्यातील असल्याचा दावा करण्यात आला आहे. यामध्ये भारतीय सैन्य चीनच्या हद्दीत जात असल्याचा दावा करण्यात आला आहे. एका बाजूला दोन्ही देशांच्या लष्करी अधिकाऱ्यांची चर्चा तर दुसरीकडे व्हिडीओ जारी करणं यामुळे चीनच्या कपटी खेळ्या समोर येत आहेत.
चीनच्या सरकारी माध्यमांनी जारी केलेला व्हिडीओ
On-site video of last June’s #GalwanValley skirmish released.
It shows how did #India’s border troops gradually trespass into Chinese side. #ChinaIndiaFaceoff pic.twitter.com/3o1eHwrIB2— Shen Shiwei沈诗伟 (@shen_shiwei) February 19, 2021
गलवान खोऱ्यात भारत आणि चीनच्या सैन्यांमध्ये झटापट झाली होती. त्यामध्ये त्यांचे 4 सैनिक मारले गेल्याचं तब्बल 9 महिन्यानंतर मान्य गेले होते. चीनमधील ग्लोबल टाईम्सनं याबाबत वृत्त दिलं होते. पब्लिक लिबरेशन आर्मीच्या क्यूई फबाओ, चेन होंगून, जियान गॉन्ग, जिओ सियुआन या चिनी सैनिकांनी जीव गमावल्याचं चीननं मान्य केले होते.अमेरिकेच्या एका गुप्त अहवालात या हाणामारीत चीनचे 40 सैनिक मारले गेल्याचं म्हटलं होतं. मात्र, नऊ महिन्यानंतर चीनने या हल्ल्यात केवळ चारच जण मारले गेल्याचं म्हटलं आहे.
मेच्या सुरुवातीलाच चीनच्या सैनिकांनी नियंत्रण रेषेवर जमावजमव सुरू केली होती. त्यामुळे भारतीय जवान सतर्क झाले होते. चीनच्या या आक्रमक पावित्र्यामुळे दोन्ही देशाच्या संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला होता. त्याचा परिणाम म्हणजे 15 जूनच्या मध्यरात्री दोन्ही सैनिकांमध्ये धुमश्चक्री उडाली. गलवान खोऱ्यातीही ही धुमश्चक्री म्हणजे गेल्या 45 वर्षातील दोन्ही देशांमधील अत्यंत भयंकर संघर्ष होता. या हाणामारीत 20 भारतीय जवान शहीद झाले होते. तर चीनचे सैनिकही मोठ्या प्रमाणावर मारले गेले होते. मात्र, चीनने त्याला पृष्टी दिली नव्हती.
संबंधित बातम्या:
गलवान खोऱ्यात चार सैनिक मारले गेले, चीनने वर्षभरानंतर दिली कबुली
(China released Galwan Valley India China face off border site video)