नवी दिल्ली: कोरोना विषाणू संसर्गाची सुरुवात झालेल्या चीनच्या वुहान शहरातील रिपोर्टिंग करणारी महिला पत्रकार अडचणीत आली आहे. चीनच्या न्यायालयानं झेंग झांग या मुक्त पत्रकार महिलेला चार वर्षांसाठी कारावासाची शिक्षा सुनावली आहे. चीनच्या वुहान शहरातील कोरोना संसर्गाचं तिनं वृत्तांकन केले होते. शांघाईमधील एका न्यायालयानं झेंग झांगला चार वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. (China Shanghai court sentenced four year jail to Zeng Zang)
झेंग झान (Zhang Zhan) हिनं फेब्रुवारी महिन्यात चीनच्या वुहान शहराचा दौरा केला होता. झांग हिने तिच्या रिपोर्टमधून वुहान शहरातील सत्य परस्थिती मांडण्याचा प्रयत्न केला होता. चीन कोरोनाविषयी दडवत असलेली माहिती मांडल्यामुळे झेंग झान संकटात सापडली होती. मे महिन्यात ती अचानक गायब झाली होती. शांघाईपासून 640 किमी अंतरावर झेंग झानला अटक करण्यात आल्याचं समोर आलं होते. कायदा सुव्यवस्था भंग केल्याचा आरोप तिच्यावर लावण्यात आला होता. त्यानंतर झेंग झांगला वकील मिळण्यासाठी 3 महिने जावे लागले.
चीनमध्ये साधारणपणे पत्रकार आणि मानवाधिकार कार्यकर्त्यांना अडचणीत आणण्यासाठी ‘वाद घालणे आणि कायदा सुव्यवस्था बिघडवणे’ या कायद्याचा वापर केला जातो. या कायद्याद्वारे त्यांना तुरुंगात टाकले जाते. झेंग झान ही पहिली स्वतंत्र पत्रकार जिला कोरोना विषाणूबद्दलचं रिपोर्टिंग केल्यामुळे शिक्षा झाली आहे.
आतापर्यंत 8 जणांना शिक्षा
कोरोना विषाणू संदर्भातील सत्य परिस्थिती लपवण्याचा चीनकडून प्रयत्न करण्यात आला. चीन सरकारच्या या प्रयत्नाविरोधात भूमिका घेणाऱ्या आठ व्हिसलब्लोअर्स आणि पत्रकारांना शिक्षा करण्यात आली आहे.
झेंग झांगचे उपोषण
झेंग झान हिनं तिच्या विरोधातील कारवाई विरोधात उपोषण केले आहे. 18 सप्टेंबरला तिच्या विरोधातील आरोप निश्चित करण्यात आले. झेंग झानच्या वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार तिने काहीही खाण्यास नकार दिला आहे. यामुळे तिची तब्येत बिघडत आहे. झेंग झांग हिनं प्रकृती बिघडली तरी उपोषण सोडलेले नाही.
दरम्यान, जगभरात 8 कोटींहून अधिक लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. आतापर्यंत जगभरात कोरोनामुळे 17 लाख लोकांना जीव गमवावा लागला आहे. सर्वाधिक कोरोना रुग्णांची नोंद अमेरिकेत झाली असून सर्वाधिक मृत्यू देखील अमेरिकेत झाले आहेत. तर, भारतात 1 कोंटीपेक्षा जास्त कोरोना रुग्ण आढळलेत.
संबंधित बातम्या:
अमेरिकेत ‘या’ लसीमुळे साईड इफेक्ट?, वाचा नेमकं काय घडलं?
कोरोनाचे फक्त 49 रुग्ण, तरीही संपूर्ण देशात लॉकडाऊन… जाणून घ्या या देशाचा ‘कोरोना डिफेन्स’ प्लान
(China Shanghai court sentenced four year jail to Zeng Zang)