चीनच्या कारनाम्याने जग पुन्हा टेन्शनमध्ये, रॉकेटवरील नियंत्रण सुटलं, कधीही-कुठेही कोसळण्याचा धोका

| Updated on: May 03, 2021 | 1:00 PM

चीननं अवकाशात सोडलेल्या रॉकेटवरील नियंत्रण सुटल्यानं नवी समस्या निर्माण झाली आहे. Long March 5b uncontrolled

चीनच्या कारनाम्याने जग पुन्हा टेन्शनमध्ये, रॉकेटवरील नियंत्रण सुटलं, कधीही-कुठेही कोसळण्याचा धोका
Long March 5b
Follow us on

नवी दिल्ली: चीनच्या अंतराळ मोहिमेला एक धक्का बसला आहे. चीननं अवकाशात सोडलेल्या लाँग मार्च 5ब रॉकेटवरील ( Long March 5b) नियंत्रण सुटल्यानं नवी समस्या निर्माण झाली आहे. रॉकेटवरील निंयत्रण सुटल्यानं ते निर्धारित ठिकाणी पडण्याऐवजी नक्की कुठे पडेल या विषयी अनिश्चितता निर्माण झाली आहे. रॉकेट पृथ्वीवर कोणत्या ठिकाणी पडणार हा प्रश्न निर्माण झाला आहे. (China’s space station huge rocket uncontrolled may fall back on Earth soon)

काहीचं दिवसांपूर्वी झालेलं लाँचिंग

चिनी अंतराळ संशोधन संस्थेने 29 एप्रिलला 21 टन वजनाचं लाँग मार्च 5ब रॉकेट लाँच केलं होतं. चीनकडून अंतराळात नव्यानं अंतराळ केंद्राची निर्मिती करण्यात येत आहे. तिथे जाण्यासाठी रॉकेटचं लाँचिंग करण्यात आलं होतं. निंयत्रित कार्यक्रमानुसार हे रॉकेट महासागरात कोसळणार होतं. मात्र, त्यावर नियंत्रण सुटलं आहे.

रॉकेट पृथ्वीवर कधी कोसळणार

चीनच्या अवकाश संशोधन कार्यक्रमाचं वृत्तांकन करणाऱ्या पत्रकार अँण्ड्रू जोन्स यांनी ते रॉकेट येत्या काही दिवसात पृथ्वीवर कोसळेल, अशी माहिती दिली आहे. लाँग मार्च 5ब 100 फूट लांब आणि 16 फूट रुंद आकाराचं आहे. बहुतांश रॉकेट ही महासागरामध्ये कोसळतात. मात्र, याच्यावरील नियंत्रण सुटल्यानं ते जमिनीवर देखील पडू शकतं, अशी शक्यता आहे.

रॉकेट कुठे कोसळणार?

अँड्रू जोन्स यांच्या अंदाजानुसार रॉकेट न्यूयॉर्क, मद्रिद बीजिंग आणि दक्षिण चिली, वेलिंग्टन, न्यूझीलंड या भागात कोसळू शकतं. चीनचा अवकाशात नवं अंतराळ स्थानक उभारण्याचा विचार आहे. त्यासाठी चीनकडून 11 रॉकेटचं लाँचिंग 2022 पर्यंत करण्यात येणार आहे. 2018 मध्येही चीनच्या एका रॉकेटवरील नियंत्रण सुटलं होतं.

चीनच्या अवकाश संशोधन केंद्रानं लाँग मार्च 5 ब या रॉकेटची चाचणी करण्यासाठी मे 2020 मध्ये लाँचिंग केलं होतं. त्यावेळी देखील नियंत्रण सुटल्यानं ते सहा दिवसांनंतर पृथ्वीवर कोसळलं होतं.

संबंधित बातम्या:

मंगळावरुन पृथ्वी कशी दिसते पाहिलात का? जगातला सर्वात वेगानं शेअर केला जाणारा फोटो पाहा

शास्त्रज्ञांच्या हाती लागले डायनासोरचे अवशेष, पृथ्वीवर आतापर्यंतचा सगळ्यात मोठा जीव असल्याचा दावा

(China’s space station huge rocket Long March 5b uncontrolled may fall back on Earth soon)