कोण होणार अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष? भारतीय वंशाचे लोक कोणाच्या बाजूने ?

| Updated on: Oct 31, 2024 | 2:17 PM

भारतीय अमेरिकन नागरिकांची लोकसंख्या 5.2 दशलक्ष आहे. अमेरिकेतील हा दुसरा सर्वात मोठा स्थलांतरीत नागरिकांचा समुह बनला आहे. राजकीय दृष्ट्या महत्वाच्या असलेल्या भारतीय समुदायापैकी 2.6 दशलक्ष सदस्य पात्र मतदार आहेत. अमेरिकेच्या 2024 च्या निवडणूकीत भारतीय समुहाचे महत्व वाढलेले आहे. कारण भारतीय वंशाच्या कमला हॅरिस डेमोक्रेटिक पक्षाच्या उमेदवार आहेत.

कोण होणार अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष? भारतीय वंशाचे लोक कोणाच्या बाजूने ?
donald trump VS Kamala harris
Follow us on

अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक आठवड्यावर आलेली आहे.अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणूकीत भारतीय मूळाचे नागरिक डेमोक्रेटिक पक्षाचे समर्थन करणार आहेत. परंतू डेमोक्रेटिक पक्षाबद्दलचे त्यांचे प्रेम पहिल्यापेक्षा कमी झालेले आहे.इंडियन अमेरिकन एटीट्यूड सर्वेक्षणात (IAAS) भारतीय वंशाच्या नागरिकांचा हा कल उघडकीस आलेला आहे.

सर्वेक्षणाच्या मते नोंदणीकृत भारतीय अमेरिकन मतदारांपैकी 61 टक्के लोक डेमोक्रेटिक पार्टीच्या उमेदवार कमला हॅरिस यांना पाठींबा देत आहे. तर सुमारे 32 टक्के भारतवंशीय रिपब्लिकन उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्या पाठीशी आहेत,सर्वेक्षणात आलेले काही मुद्दे पाहूयात…

डेमोक्रेटीकचा जनाधार घसरला :

सर्वेक्षणात 47 टक्के भारतीय अमेरिकन लोक स्वत:ला डेमोक्रेट पार्टीचे समर्थक मानत आहेत. साल 2020 च्या निवडणूकीत हा आकडा 56 टक्के होता. त्यामुळे जनाधार घटला आहे. तर रिपब्लिकन समर्थकांच्या संख्येत जास्त बदल झालेला नाही. साल 2022 च्या निवडणूकीच्या तुलनेत तटस्थ वा स्वतंत्र लोकांचे प्रमाण वाढले आहे.

सहापैकी दोन भारतवंशी कमला हॅरिस यांनी व्होट देण्याच्या बाजूने आहे. सर्वेक्षणानुसार 61 टक्के नोंदणीकृत भारतीय मतदार कमला हॅरिस यांना व्होट देणाची योजना बनवित आहेत. तर माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना 32 टक्के लोक मतदान करण्याची इच्छा व्यक्त करीत आहेत. भारतीय अमेरिकन नागरिकांच्या प्राथमिकतेत थोडासा बदल झालेला आहे. गेल्या निवडणूकीच्या तुलनेत यंदा ट्रम्प यांना मत देण्यास इच्छुक लोकांच्या संख्यत वाढ झाली आहे.

ट्रम्प यांची लोकप्रियता –

सर्वेत लैंगिकदृष्ट्या देखील भारतीय वंशाच्या नागरिकांत वाटणी झालेली आहे. भारतीय अमेरिकन महिला मतदार कमला हॅरिस यांच्या बाजूने आहेत. तर भारतीय अमेरिकन पुरुष मतदार ट्रम्प यांच्या बाजूने आहेत. ट्रम्प यांची लोकप्रियता वाढलेली आहे.तरुणांमध्ये ट्रम्प लोकप्रिय आहेत. सर्वेनुसार 67 टक्के भारतीय अमेरिकन महिला हॅरिस यांना मत देण्याची इच्छा व्यक्त करीत आहेत. तर 53 टक्के पुरुष ( जे खूपच कमी प्रमाण आहे ) कमला हॅरिस यांच्या बाजूने आहेत.

गर्भपाताचा मुद्दा –

या निवडणूकीत भारतीय अमेरिकन लोकांसाठी गर्भपात आणि प्रजननाचा अधिकार हा महत्वाचा मुद्दा आहे. जो चलनदर आणि वाढत्या किंमतीनंतरचा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे.डेमोक्रेट आणि महिला या निवडणूकीत गर्भपात मुद्द्याने विशेष प्रेरित झाल्या आहेत.