मुंबई : एखाद्याने नियम मोडले आणि पोलिसांनी पकडल्यावर ओळखीच्या व्यक्तीला फोन करुन दंडापासून वाचण्याचा प्रयत्न करताना तुम्ही अनेकांना पाहिलं असेल. पण एका पंतप्रधानाने नियम मोडले, पोलिसांनी त्यांना दंड ठोठावला आणि त्यांनी तो भरलाही! वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल पण ही घटना वास्तवात घडली आहे. नॉर्वेच्या पोलिसांनी शुक्रवारी पंतप्रधान एर्ना सोल्बर्ग यांना कोरोना नियमांचं उल्लंघन केल्या प्रकरणी दंड ठोठावला आहे. (Norwegian PM Erna Solberg breaks corona rule, fined 1.76 million by police)
पंतप्रधान एर्ना सोल्बर्ग यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त घरातच एका पार्टीचं आयोजन केलं होतं. या पार्टीमध्ये सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं उल्लंघन झालं. त्यानंतर नॉर्वेच्या पोलीस प्रमुखांनी देशाच्या पंतप्रधानांकडून दंड वसूल केल्याची माहिती पत्रकार परिषद घेऊन दिली. नॉर्वे हा युरोपमधील अशा देशांपैकी एक आहे, जो कोरोना विरोधातील लढाईत यशस्वी मानला जातो. एर्ना सोल्बर्ग या नॉर्वेच्या लोकप्रिय पंतप्रधान आहेत. डिसेंबर 2021 मध्ये त्यांनी निवडणुकीलाही सामोरं जायचं आहे.
नॉर्वे पोलिसांनी पंतप्रधान एर्ना सोल्बर्ग यांच्याकडून थोडाथोडका नाही तर तिथले 20 हजार क्राऊन्स म्हणजे जवळपास 1 लाख 76 हजार रुपये दंड वसूल केला आहे. फेब्रुवारीच्या अखेरिस सोल्बर्ग यांनी एका माऊंटर रिसॉर्टमध्ये आपल्या 60 व्या वाढदिवसानिमित्त पार्टीचं आयोजन केलं होतं. या पार्टमध्ये त्यांच्या परिवारातील 13 सदस्य सहभागी झाले होते. नार्वे सरकारने 10 पेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास मज्जाव केलाय. अशावेळी पंतप्रधानांच्या पार्टीमध्येच 13 लोक जमले होते. याबाबत एर्ना सोल्बर यांनी झालेल्या चुकीबाबत जाहीर माफीही मागितली होती. पोलिसांचं म्हणणं आहे की, ते सहसा दंड वसूल करत नाहीत. पण सरकारकडून नियमावली जारी करत असताना पंतप्रधान हे प्रमुख चेहरा असतात. त्यामुळे सोल्बर्ग यांच्याकडून दंडाची वसुली करण्यात आलीय.
ये महिला हैं नॉर्वे की प्रधानमंत्री।#COVID19 के नियमों का उल्लंघन करते हुए इन्होंने एक रिसॉर्ट में अपने जन्म दिन की पार्टी दी और 13 मेहमानों को बुलाया।
नियम है कि 10 से ज्यादा मेहमान नहीं बुला सकते।
पुलिस ने जुर्माना लगा दिया और उन्हें भरना पड़ा।
पुलिस और प्रधानमंत्री को सलाम ! pic.twitter.com/G9fKJXBvCF— Sanjay Nirupam (@sanjaynirupam) April 9, 2021
इतर बातम्या :
अमेरिकेचं युद्ध जहाज परवानगीशिवायच भारताच्या हद्दीत, लक्षद्वीपजवळील हालचालींनी तणाव वाढण्याची शक्यता
Prince Philip : इंग्लंडच्या राणीचे पती, प्रिन्स फिलीप यांचं 99 व्या वर्षी निधन
Norwegian PM Erna Solberg breaks corona rule, fined 1.76 million by police