Covid Side Effects : कोरोनामुळे तुमच्या शरिरातील ‘या’ पार्टवरही होऊ शकतो मोठा परिणाम, 30 वर्षीय तरुणाचा दावा आणि तज्ज्ञांचं मत काय?

| Updated on: Jan 13, 2022 | 10:25 PM

कोविड(Covid)च्या संसर्गामुळे जननेंद्रिय (Penis) एक इंच-दीड इंच कमी झालं आहे, असा दावा एका व्यक्तीनं केलाय. तर अशाप्रकरची समस्या उद्भवल्यास त्यावर उपचार आहेत, असं डॉक्टरांचं मत आहे.

Covid Side Effects : कोरोनामुळे तुमच्या शरिरातील या पार्टवरही होऊ शकतो मोठा परिणाम, 30 वर्षीय तरुणाचा दावा आणि तज्ज्ञांचं मत काय?
कोविडचा लिंगाच्या आकारावर परिणाम (सौ. Getty/iStockphoto)
Follow us on

कोविड(Covid)च्या संसर्गामुळे जननेंद्रिय (Penis) एक इंच-दीड इंच कमी झालं आहे, असा दावा एका यूके(UK)मधल्या व्यक्तीनं केलाय. संबंधित व्यक्ती स्वत:ची ओळख जगजाहीर करू इच्छित नाही. कोविडचा संसर्ग झाल्यानंतर ही समस्या उद्भवल्याचा त्याचा दावा आहे. तर डॉक्टरांकडून तपासणी केल्यानंतरही त्याचं समाधान झालेलं नाही. यात काहीह करता येवू शकत नाही, असं वैद्यकीय तज्ज्ञांचं मत आहे.

रुग्ण तणावात
संबंधित व्यक्ती या समस्येनंतर प्रचंड तणावात असून निराश झाल्याचं समजतंय. युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनच्या 3,400 लोकांच्या अभ्यासात साधारणपणे 200 लोकांमध्ये हे लक्षण दुर्मीळ लक्षण आढळून आल्याचं तज्ज्ञांनी म्हटलंय.

कायमस्वरूपी समस्या
हाऊ टू डू इट या पॉडकास्टवर बोलताना रुग्ण म्हणाला, की मी तीस वर्षाचा एक विषमलिंगी माणूस आहे. गेल्या वर्षी जुलैमध्ये मला कोविडचा संसर्ग झाला आणि मी खूप आजारी पडलो. जेव्हा मी हॉस्पिटलमधून बाहेर पडलो, तेव्हा मला इरेक्टाइल डिसफंक्शनची समस्या जाणवू लागली. काही वैद्यकीय उपचार घेतल्यानंतर ती हळूहळू दूरही झाली. मात्र माझ्या लिंगाच्या आकारामध्ये काही समस्या निर्माण झाल्या आहेत. त्या कायमस्वरूपी असण्याची भीती सतावतेय.

‘माझ्या आत्मविश्वासावर झालाय परिणाम’
तो म्हणतो, की माझे लिंग आकुंचन पावलं आहे. मी आजारी पडण्यापूर्वी लिंगाचा आकार सरासरी होता. आता मी सुमारे दीड इंच आकार गमावलाय म्हणजेच सरासरीपेक्षा आकार कमी झालाय. वरवर पाहता रक्तवहिन्यासंबंधीच्या नुकसानीमुळे हे घडलंय. डॉक्टरांना विचारलं असता, हे कायमस्वरुपी राहणार असल्याचं सांगितंल, असं तो म्हणालाय. आकाराचा शरीरसंबंधावर काही परिणाम होणार नसला तरी माझ्या आत्मविश्वासावर मात्र खोलवर परिणाम झाल्याचं त्यानं सांगितलंय.

विषाणूमुळे लिंगातल्या रक्तप्रवाहावर परिणाम?
पॉडकास्टवर बोलताना यूएस यूरोलॉजिस्ट अॅशले विंटर एमडी म्हणाले, की लिंगात तणाव न येणं हा कोविडचा परिणाम असू शकतो. लिंगातल्या रक्तप्रवाहावर कोविडचा परिणाम होऊन इरेक्टाइल डिसफंक्शन म्हणजेच लिंग ताठरता न येण तसंच आकार लहान होणं अशा समस्या निर्माण होऊ शकतात. या विषाणूमुळे शिश्नामध्ये योग्य रक्तप्रवाह येत नाही. त्याचा हा परिणाम आहे.

‘त्रासातून बरं होण्याचे उपचार करावे’
डॉ. विंटर यांनी युरॉलॉजिस्टच्या अभ्यासाचा संदर्भ दिला, ज्यामध्ये असं आढळलं, की विषाणूपासून पूर्णपणे बरं झालेल्या दोन पुरुषांच्या लिंगामध्ये अजूनही त्याचं अंश आहेत. दोन्ही पुरुष संसर्ग झाल्यानंतर काही महिन्यांनी पेनिस इम्प्लांट शस्त्रक्रियेसाठी गेले. दरम्यान यातल्या तज्ज्ञांनी सांगितलं, की अशाप्रकरची इरेक्टाइल डिसफंक्शनची समस्या उद्भवल्यास त्यावर उपचार आहेत, जे रुग्णांना त्रासदायक अनुभवातून बरं होण्यास मदत करू शकतात.

Video – Gadchiroli | महाराष्ट्रातील हत्ती गुजरातमध्ये नेण्यास विरोध; मंत्री, खासदारही मैदानात, कमलापुरातील हत्तीप्रेमींच म्हणण काय?

Corona : कोरोना रुग्णसंख्येचा विस्फोट, 27 टक्के रुग्णवाढ, 2 लाख 47 हजार रुग्णांची नोंद

‘कोरोना प्रोटोकॉलचे पालन, 100 टक्के लसीकरणासाठी प्रयत्न करा’, जी किशन रेड्डी यांचे पूर्वोत्तर राज्यांना आवाहन