एक दत्तक दिलेली तरुणी तिच्या वडीलांना गेल्या दहा वर्षांपासून शोधत होती. परंतू त्यांचा ठावठिकाणा काही लागत नव्हता. परंतू अखेर तिचे वडील तिच्या समोर आले तेव्हा तिच्या पायाखालची जमीनच सरकली. कारण जो मनुष्य तिच्या समोर उभा होता. तो मनुष्य गेली तीन वर्षे तिच्या फेसबुक फ्रेंड लिस्टमध्येच होता. परंतू नशिबाचा खेळ पहा या दोघांनाही या आपल्या नात्याबद्दल कसलीही कल्पना नव्हती.
जॉर्जियात राहणाऱ्या तमुना मुसेरिद्जे या पेशाने एक पत्रकार आहेत. बीबीबीच्या बामतीनुसार तमुना हीने आपल्या पित्याचा शोध दोन दशकांपूर्वी सुरु केला होता. तमुना हीच्या आईचा मृत्यू झाल्यानंतर घराची सफाई करताना तिला एक बर्थ सर्टीफिकेट मिळाले. त्यावर तिची जन्मतारीख चुकीची लिहीली होती. त्यामुळे तिला आपल्याला दत्तक घेतल्याचा संशय आहे. त्यांनी २०२१ मध्ये आपल्या जैविक आई-वडीलांचा शोध करु करण्यासाठी फेसबुकवर एक ग्रुप स्थापन केला.
येथे पहा पोस्ट –
साल २०२४ च्या सुरुवातीला एका ग्रामीण महिलेचा तमुना हीला फेसबुकवर मॅसेज आला. या महिलेने दावा केला की जॉर्जियाची राजधानी त्बिलिसीमध्ये तिच्या मावशीने सप्टेंबर १९८४ मध्ये आपल्या प्रेग्नेंसीची गोष्ट लपविली होती. ती तमुना हीच्या जम्नाच्या वेळी साधर्म्य दाखविणारी आहे. अनेकदा बोलल्यानंतर महिलेने या नात्याची सत्यता सांगण्यासाठी डीएनए टेस्टची तयारी दाखवली.
तमुना हीने सांगितले की टेस्टपूर्वी जेव्हा तिने आपल्या कथित आईशी फोनवर बोलण्याचा प्रयत्न केला ते्व्हा तिने मोठ्याने ओऱडून मी कुठल्याही मुलाला जन्म दिलेला नाही असा संताप तिने व्यक्त केला आणि आपल्याशी कोणताही संबंध ठेवू नकोस असा दम दिला. फोनवरुन आपल्या कथित आईच्या प्रतिक्रीयेने तमुना हीला धक्का बसला.
नशीबाचा खेळ पाहा डीएनएच्या चाचणीत तमुना जिच्याशी फोनवर बोलत होती ती तिची खऱी आई निघाली. या पुराव्याने तिने आपल्या जैविक आईशी पुन्हा संपर्क करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तिला कळले की गुरगेन खोरावा नावाचा व्यक्ती तिचा खरा बाप आहे. तमुना हीने त्यानंतर या नावाने फेसबुकवर सर्च केले तर तिला धक्का दिसला हा व्यक्ती तिच्या फेसबुक फ्रेड लिस्टमध्ये तीन वर्षांपासून होता.
खूप काळाने बाप आणि लेकीची अखेर भेट झाली. खोरावाने तमुना हीची तिच्या सावत्र बहिण-भावंडाशी ओळख करुन दिली. तेव्हा तिला आश्चर्य वाटले की आपल्या इतर भावंडांपेक्षा आपण किती वडीलांसारखे हुबेहुब दिसतो. त्यानंतर कळले की तिच्या आईने लग्नाशिवाय मुलाला जन्म दिल्याने लाजेखातर ही गोष्ट लपविली होती. एवढेच तिला जन्म दिल्यानंतर तिची आई दुसऱ्या शहरात निघून गेली. परंतू नशिबात काही औरच होते, त्यांना भेटायचे विधीलिखितच होते.