नवी दिल्ली : पाकिस्तानात एका हिंदू परिवारातील 5 जणांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. ही घटना रहीम यार खान शहरात घडल्याचं सांगितलं जात आहे. या लोकांवर चाकू आणि कुऱ्हाडीने वार करण्यात आले. संशयितरित्या त्यांचे मृतदेह आढळून आले. अत्यंत निर्घृणपणे त्यांचा गळा चिरण्यात आला होता. या घटनेनंतर हिंदू समुदायात मोठ्या भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. त्यांचे मृतदेह रहीम यार खान शहरापासून 15 किलोमीटर अंतरावर त्यांच्या निवासस्थानी आढळून आले आहेत.(Deadly attack on a Hindu family in Pakistan, 5 members of the same family killed)
हत्या करण्यासाठी वापरण्यात आलेले शस्त्रास्त्र पोलिसांनी हस्तगत केले आहेत. त्यात चाकू आणि कुऱ्हाडींचा समावेश आहे. पाकिस्तानच्या पंजाब प्रांताचे मुख्यमंत्री सरदार उस्मान बुजदार यांनी घटनेची माहिती मिळवली असून, आरोपींना तातडीने अटक करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या प्रकरणी न्यूज इंटरनॅशनलमधून रहिम यार खान शहरातील सामाजिक कार्यकर्ते बिरबल दास यांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या परिवाराची हत्या करण्यात आली आहे, त्यांचं कुणाशीही शत्रूत्व नाही. ते शांतपणे आपलं जीवन जगत होते.
मिळालेल्या माहितीनुसार मृत्यू झालेल्यांपैकी एकाचं नाव रामचंद होतं. ते मेघवाल हिंदू होते आणि त्यांचं वय 35 ते 36 वर्षे होतं. ते अनेक वर्षांपासून टेलरिंगचा व्यवसाय करत होते. रामचंद हे खूप शांत व्यक्ती होते आणि आनंदाने जगत होते. या घटनेनंतर प्रत्येकजण अस्वस्थ आहे. तर स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. पोलीस लवकरच आपला अहवाल सादर करतील असंही सांगण्यात आलं आहे.
यापूर्वीही पाकिस्तानात अशा प्रकारच्या घटना समोर आल्या आहेत. इथे अल्पसंख्याक हिंदू समाजावर सातत्याने अन्याय होत आहे. हिंदू कुटुंबातील मुलींचं अपहरण केलं जातं. शांततेत जीवन जगत असलेल्या हिंदू समाजातील नागरिकांची अत्यंत निघृणपणे हत्या केली जाते. गेल्या महिन्यात सिंध प्रांतातील एका पोलिसाने हिंदू समाजातील एका मुलीचं अपहरण करुन तिच्याशी लग्न केलं. तसंच तिचं धर्मपरिवर्तन केल्याचीही घटना घडली होती.
संबंधित बातम्या :
पाकिस्तानमध्ये अर्थमंत्र्यांच्या पराभवाने सरकारविरोधात अविश्वास ठराव, इमरान खान यांना किती मतं?
Video : पाकिस्तानात इम्रान खान यांची अब्रू वाचली, पण समर्थकांची जोरदार राडेबाजी
Deadly attack on a Hindu family in Pakistan, 5 members of the same family killed