लंडन : इंग्लंडच्या (England) महाराणी एलिझाबेथ द्वितीय (Queen Elizabeth) यांचं निधन झालं आहे. वयाच्या 96 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मागील अनेक दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजणक होती. डॉक्टरांनी त्यांना वैद्यकीय निरीक्षणात (medical observation) ठेवले होते. इंग्लंडच्या पंतप्रधान लिज ट्रस यांनी ट्विट करक त्यांच्या प्रकृतीबाबतचे अपडेट दिली होती. महाराणी या बालमोरलमध्ये होत्या. त्यांच्या प्रकृतीबाबतचे वृत्त समजताच त्यांचा मुलगा प्रिन्स चार्ल्स आणि नातू प्रिन्स विल्यम रवाना झालेत.
शाही राजघराण्याच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून महाराणी एलिझाबेथ यांच्या निधनाचे वृत्त देण्यात आले. आज दुपारी बालमोरलमध्ये त्यांचे निधन झाले. लवकरच शाही परिवार लंडनमध्ये दाखल होणार आहे.
The Queen died peacefully at Balmoral this afternoon.
The King and The Queen Consort will remain at Balmoral this evening and will return to London tomorrow. pic.twitter.com/VfxpXro22W
— The Royal Family (@RoyalFamily) September 8, 2022
I had memorable meetings with Her Majesty Queen Elizabeth II during my UK visits in 2015 and 2018. I will never forget her warmth and kindness. During one of the meetings she showed me the handkerchief Mahatma Gandhi gifted her on her wedding. I will always cherish that gesture. pic.twitter.com/3aACbxhLgC
— Narendra Modi (@narendramodi) September 8, 2022
21 एप्रिल 1926 झाली लंडनमध्ये महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचा जन्म झाला. 20 नोव्हेंबर 1947 रोजी ग्रीक आणि डेन्मार्कचे राजकुमार प्रिन्स फिलिप यांच्याशी त्यांचा शाही विवाह झाला. 1945 साली त्या ब्रिटीश सैन्यात महिला विभागात दाखल झाल्या होत्या. 14 नोव्हेंबर 1948 रोजी त्यांचा पहिला मुलगा प्रिन्स चार्ल्स याचा जन्म झाला. 6 फेब्रुवारी 1952 रोजी वडील किंग जॉर्ज यांच्या मृत्यूनंतर त्या महाराणी झाल्या. 2 जून 1953 रोजी त्यांचा शपथविधी सोहळा पार पडला. त्यांना महाराणीचा मुकुट घालण्यात आला. 21 जून 1982 रजी त्यांचा नातू प्रिन्स विलियम याचा जन्म झाला. 6 फेब्रुवारी 2012 रोजी 60वर्षे पूर्ण केली म्हणून हिरक महोत्सव साजरा करण्यात आला. 9 सप्टेंबर 2015 साली इंग्लंडवर सर्वाधिक काळ राज्य करणाऱ्या त्या पहिल्या महिला सम्राज्ञी ठरल्या. एप्रिल 2020 मध्ये देशाला कोरोनापासून वाचवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. 9 एप्रिल 2020 रोजी त्यांचे पती प्रिन्स फिलिप यांचा मृत्यू झाला.