किंशासा: आफ्रिकेतील डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो या देशात एका रहस्यमय आजाराची साथ पसरली आहे. या रोगाविषयी अजून पुरेशी माहिती उपलब्ध नसल्यामुळे त्याला Disease X असे संबोधले जात आहे. काँगोतील एका महिलेत या आजाराची लक्षणे आढळून आली आहेत. Disease X च्या आजाराचे विषाणू अत्यंत घातक असल्याचे लक्षात आल्यानंतर आता रशियाकडून काँगोत तपासण्या सुरु करण्यात आल्या आहेत. (Disease X to Alarm bells in medical world patient zero found in Congo)
या पार्श्वभूमीवर इबोला विषाणूच्या शोधात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे प्राध्यापक जीन-जॅक्स मुयेम्बे तामफूम यांनी जगाला सावधानतेचा इशारा दिला आहे. हा विषाणू इबोलापेक्षा भयंकर असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
काँगोतील ज्या महिलेला Disease X ची लागण झाली आहे तिला प्लॅस्टिकच्या आवरणात ठेवण्यात आले आहे. एका खिडकीतून नातेवाईकांना तिच्याशी बोलण्यास परवानगी देण्यात आली आहे. डॉक्टरांनी अद्याप या महिलेची ओळख गुप्त ठेवली आहे. मात्र, या रोगाची लक्षणे पाहून तेथील डॉक्टरांच्या मनातही धास्ती निर्माण झाली.
मात्र, या महिलेल्या मुलामध्येही अजूनपर्यंत Disease X ची कोणतीही लक्षणे आढळून आलेली नाहीत. ‘डेली मेल’च्या माहितीनुसार या महिलेच्या शरीरातून रक्त येत असून तिला तापही (Hemorrhagic) आला आहे.
Disease X हा विषाणू कोरोनाच्या व्हायरसप्रमाणे वेगाने पसरु शकतो. हा व्हायरस इबोला पेक्षाही घातक आहे. आतापर्यंत झालेल्या तपासण्यांमध्ये संबंधित महिलेच्या शरीरातील विषाणूचे आतापर्यंत माहिती असलेल्या विषाणूंशी कोणतेही सार्धम्य आढळून आलेले नाही. त्यामुळे हा व्हायरस जगभरात वेगाने पसरण्याची भीती डॉक्टरांना वाटत आहे.
संबंधित बातम्या:
Pfizer ची लस घेतल्यानंतर आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू, फिनलँड-बुल्गेरियामध्ये साईड इफेक्ट्सची प्रकरणं
चीनचा कुबेर अचानक बेपत्ता, सरकारसोबतचा वाद भोवला? प्रकरण काय?
दक्षिण कोरियात बाळ जन्माला घाला, लाखो कमवा
(Disease X to Alarm bells in medical world patient zero found in Congo)