काठमांडू : जगात विचित्र माणसं आणि विचित्र घटनांची काही कमी नाही, पण काही घटना तर अशा घडतात जे ऐकून भल्याभल्यांचं डोकंच चक्रावतं. नेपाळमध्येही (Nepal) अशीच एक घटना घडली आहे. पोटात प्रचंड वेदना (stomach pain) होत असल्याची तक्रार करत एक तरूण डॉक्टरांकडे गेला. मात्र त्याची तपासणी केल्यानंतर पोटात जे आढळलं ते पाहून डॉक्टरांचं (doctors) डोकही गरगरलं.
26 वर्षीय तरूणाच्या पोटात खालच्या भागात खूप दुखायला लागल्यावर तो डॉक्टरांकडे गेला असता त्याची शस्त्रक्रिया करावी लागली. धक्कादायक गोष्ट म्हणजे शस्त्रक्रिया केल्यानंतर त्या तरूणाच्या पोटातून चक्क एक व्होडकाची बाटली काढण्यात आली. नुरसाद मन्सुरी असे त्या तरूणाचे नाव असून ही अतिशय विचित्र घटना नेपाळमधील रौतहाट जिल्ह्यातील गुजारा नगरपालिका क्षेत्रात घडली आहे.
नुरसाद याच्या पोटात अचानक दुखायला लागले. त्याच्या वेदना खूपच वाढल्याने तो रुग्णालयात गेला. तेथे डॉक्टरांनी त्याची चाचणी केली असता शस्त्रक्रिया करण्याची गरज असल्याचे सांगितले. या शस्त्रक्रियेदरम्यान त्याच्या पोटातून व्होडकाची एक बाटली निघाली. हे पाहून सर्वांनाच मोठा धक्का बसला.
त्या तरूणांच आतडं फाटलं
पोटदुखीच्या तक्रारीमुळे पाच-सहा दिवसांपूर्वी नुरसादला एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तपासण्यानंतर पोटातील बाटली काढण्यासाठी त्याच्यावर दोन ते अडीच तास शस्त्रक्रिया सुरू होती. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘या बाटलीमुळे त्या तरूणाचं आतडं फाटलं होतं. त्यामुळे अन्नपचन झाल्यानंतर उरलेला चोथा मलाच्या स्वरूपात बाहेर पडत होता आणि त्याचे आतडेही सुजले होते.’ मात्र आता नुरसादची प्रकृती स्थिर असून त्याच्या जीवाला कोणताही धोका नाही, असे डॉक्टरांनी नमूद केले.
मित्रांनी कृत्य केल्याचा संशय
या प्रकरणात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका पार्टीमध्ये नुरसादच्या मित्रांनी त्याला दारू पाजून नंतर त्याच्या गुप्तांगामधून व्होडकाची बाटली पोटात घुसवली असावी, असे म्हटले आहे. या तरूणाच्या गुदद्वारातूनच ही बाटली शरीरात गेली असा संशय पोलिसांनी अहवाला व्यक्त केला आहे.
एकाला अटक
दरम्यान याप्रकरणी रौतहट पोलिसांनी समीम शेख याला अटक केली आहे. तसेच नुरसाद याच्या अनेक मित्रांचीही पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. ‘समीम यानेच हे कृत्य केले असावे असा आम्हाला संशय असून आम्ही त्याची कसून चौकशी करत आहोत ‘ असे पोलिसांनी नमूद केले आहे. दरम्यान नुरसाद याचे अनेक मित्र फरार झाले असून त्यांचा शोध सुरू आहे.