Donald Trump | 152 वर्षांचा इतिहास मोडून डोनाल्ड ट्रम्प रवाना

| Updated on: Jan 21, 2021 | 8:50 AM

अमेरिकेत पुढील अध्यक्षाच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्याची परंपरा आहे (Donald Trump avoids Joe Biden Inauguration)

Donald Trump | 152 वर्षांचा इतिहास मोडून डोनाल्ड ट्रम्प रवाना
डोनाल्ड ट्रम्प
Follow us on

वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) यांचा बुधवारी शपथविधी सोहळा पार पडला. त्यांच्यासोबत कमला हॅरिस (Kamala Harris) यांनी उपाध्यक्षपदाची शपथ घेतली. अमेरिकन संसदेसमोर राष्ट्राध्यक्षांचा शपथिविधी सोहळा पार पडला. यावेळी अमेरिकेचे माजी अध्यक्ष माइक पेन्स (Mike Pence) उपस्थित होते. परंतु मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी आपला हेका कायम ठेवत शपथविधी सोहळ्याला अनुपस्थिती लावली. ट्रम्प यांच्या कृत्याने 152 वर्षांचा इतिहास मोडित निघाला. (Donald Trump avoids US President Joe Biden Inauguration)

उत्तराधिकाऱ्यांच्या शपथविधीला उपस्थितीची परंपरा

जो बायडेन यांच्या शपथविधीला न जाण्याची घोषणाा डोनाल्ड ट्रम्प यांनी 8 जानेवारीलाच केली होती. खरं तर अमेरिकेत पुढील अध्यक्षाच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्याची परंपरा आहे. ही परंपरा माजी राष्ट्राध्यक्ष जॉन अॅडम्स यांनी पहिल्यांदा तोडली होती. त्यानंतर ट्रम्प हे अशी परंपरा खंडित करणारे चौथे अध्यक्ष ठरले आहेत.

जॉन अॅडम्स पहिल्यांदा अनुपस्थित

अमेरिकेचे पहिले उपाध्यक्ष आणि दुसरे अध्यक्ष जॉन अॅडम्स होते. अमेरिकेच्या नव्या गणराज्याच्या स्थापनेत त्यांचा मोलाचा वाटा आहे. अमेरिकेत 1800 मध्ये फेडरलिस्ट पक्षाचे उमेदवार जॉन अॅडम्स आणि डेमोक्रेटिक-रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार थॉमस जेफरसन यांच्यामध्ये अध्यक्षपदाची निवडणूक झाली होती. त्यामध्ये जेफरसन यांनी बाजी मारली. परंतु अॅडम्स शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहिले नव्हते. इतकंच काय, तर व्हाईट हाऊसमधील कर्मचारीही अनुपस्थित होते.

अॅडम्स एक दिवस आधीच रवाना

जॉन क्वीन्सी अॅडम्स 1825 ते 1829 या काळात अमेरिकेचे अध्यक्ष होते. 1829 च्या निवडणुकीत अॅडम्स आणि अँड्र्यू जॅक्सन यांच्यात कांटे की टक्कर झाली. अँड्र्यू यांना पॉप्युलर वोट्स मिळाली, परंतु कुठल्याच उमेदवाराला इलेक्टोरल वोट्समध्ये बहुमत मिळालं नाही. मात्र पारडं जड ठरल्याने अँड्र्यू जॅक्सन विजयी झाले. तत्कालीन मावळते अध्यक्ष जॉन क्वीन्सी अॅडम्स हे जॅक्सन यांच्या शपथविधीच्या एक दिवस आधीच वॉशिंग्टन सोडून गेले.

अँड्र्यू जॉन्सन यांच्याविरोधात महाभियोग

डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात महाभियोग प्रस्ताव झाल्यानंतर अँड्र्यू जॉन्सन यांचं नाव चर्चेत आलं. महाभियोग प्रस्ताव पारित करुन पदावरुन हटवण्यात आलेले अँड्र्यू जॉन्सन हे पहिले अध्यक्ष होते. 152 वर्षांपूर्वी अँड्र्यू जॉन्सन हे आपल्या उत्तराधिकाऱ्यांच्या शपथविधीला हजर राहिले नव्हते. संरक्षण मंत्री एडिवन स्टँचन यांना पदावरुन हटवल्यामुळे 11 दिवसांत त्यांच्याविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्यात आला होता. 24 फेब्रुवारी 1868 रोजी मतदान घेऊन त्यांनाही पदावरुन काढण्याक आले. (Donald Trump avoids US President Joe Biden Inauguration)

152 वर्षांनंतर ट्रम्प यांनी इतिहास मोडला

विशेष म्हणजे डेमोक्रेटिक पक्षाने उमेदवारी न दिल्यामुळे ते पुन्हा निवडणूकही लढवू शकले नव्हते. रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार युलिसेस सिंपसन ग्रांट यांची अध्यक्षपदी वर्णी लागली. त्यामुळे जॉन्सन यांनी ग्रांट यांच्या शपथविधीला जाणे टाळले. जवळपास दीडशे वर्षांच्या इतिहासात जॉन्सन यांच्यानंतर कोणीच उत्तराधिकाऱ्याच्या शपथविधीला जाणं टाळलं नाही. राजकीय सुसंस्कृतपणाचं हे लक्षण मानलं जातं. मात्र ही परंपरा तोडत डोनाल्ड ट्रम्प यांनी जो बायडेन यांच्या शपथविधी सोहळ्याला गैरहजेरी लावली.

संबंधित बातम्या :

अखेर डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊस सोडलं, शेवटच्या भाषणात भावूक, म्हणाले…

अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडेन आता ‘एवढा’ पगार घेणार

(Donald Trump avoids US President Joe Biden Inauguration)