वॉशिंग्टन : अमेरिकेत झालेल्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचं राजकारण संपायला तयार नाही (Donald Trump Hundreds Supporters Protest ). डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा निवडणुकीत फेरफार झाल्याचा आरोप लावला आहे. सोबतच आता ट्रम्प त्यांच्या समर्थकांसोबत मिळून दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. यादरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी व्हाईट हाऊस आणि कॅपिटल बिल्डिंगसमोर मोठ्यासंख्येने जमा होत राडा घातला. त्यानंतर वॉशिंग्टन डीसीमध्ये कर्फ्यू लावण्यात आला (Donald Trump Hundreds Supporters Protest ).
#UPDATE | United States: “At President Donald Trump’s direction, National Guard is on the way along with other federal protective services,” tweets White House Press Secretary Kayleigh McEnan (File photo) https://t.co/W1e3J1JkJf pic.twitter.com/91qR4vd1Ue
— ANI (@ANI) January 6, 2021
नवे राष्ट्रपती म्हणून निवडून आलेले जो बायडेन (Joe Biden) यांनी ट्रम्प यांना संविधानाची सुरक्षा करण्याचे आवाहन केले आहे. “मी राष्ट्रपती ट्रम्प यांना आवाहन करतो की त्यांनी आपली शपथ पूर्ण करण्यासाठी तात्काळ राष्ट्रीय प्रसारमाध्यमावर जावं आणि संविधानाची सुरक्षा करावी आणि हे सर्व थांबवावं”, असं बायडेन म्हणाले.
निवडणुकीच्या निकालांनंतर अमेरिकेच्या सर्व खासदारांची बैठक बोलावण्यात आली होती. मात्र, या बैठकीपूर्वीच ट्रम्प समर्थकांनी व्हाईट हाऊस आणि कॅपिटल भवनसमोर गर्दी करण्यास सुरुवात केली. यावेळी मोठा गोंधळ उडाला. त्यानंतर पोलीस आणि समर्थकांमध्ये झटापटही झाली. या हिंसाचारात गोळी लागून एका महिलेचा मृत्यूही झाला, अशी माहिती रॉयटर्सने दिली आहे.
तसेच, वॉशिंग्टन पोलिसांनीही याबाबत अधिकृत माहिती दिली. “कॅपिटल भवनच्या आत एका व्यक्तीला गोळी लागली आहे. हिसेंत अनेक अधिकारी जखमी झाले आहेत. यादरम्यान, ज्या महिलेलाही गोळी लागली तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे”.
US Capitol under lockdown following violent protests by pro-Trump demonstrators
Read @ANI Story | https://t.co/JNjm2zJMwY pic.twitter.com/SyDUorutWZ
— ANI Digital (@ani_digital) January 6, 2021
“Please support our Capitol Police and Law Enforcement. They are truly on the side of our Country. Stay peaceful,” tweets outgoing US President Donald Trump. (File photo) https://t.co/W1e3J1JkJf pic.twitter.com/xM7kzmhQBP
— ANI (@ANI) January 6, 2021
डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या समर्थकांना आवाहन केलं आहे की त्यांनी शांततेत निदर्शनं करावी. “आंदोलनादरम्यान हिंसा व्हायला नको. लक्षात ठेवा आपला पक्ष कायदा आणि सुव्यवस्था मानणारा पक्ष आहे”, असं ते म्हणाले (Donald Trump Hundreds Supporters Protest )
#WATCH | I call on President Trump to go on national television now to fulfil his oath and defend the Constitution and demand an end to this siege: US President-Elect Joe Biden on US Capitol mob violence pic.twitter.com/CEaChwBsdd
— ANI (@ANI) January 6, 2021
जो बायडेन यांनी सांगितलं की, “कॅपिटल भवनावर जो गोंधळ आपण पाहिला आम्ही तसे नाही. ही कायदा न मानणाऱ्या लोकांची खूप कमी संख्या आहे. हा देशद्रोह आहे”, असं म्हणत बायडेन यांनी त्यांचा रोष व्यक्त केला.
युएस कॅपिटल भवनात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. त्याशिवाय, अनेक काँग्रेस भवन रिकोमे करण्यात आले आहेत. ट्रम्प समर्थकांच्या वाढत्या हिंसक प्रदर्शनामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी एक वाजताच्या जवळपास ट्रम्प समर्थकांनी कॅपिटल भवनाजवळ लागलेले बॅरिअर्स तोडले. हे सर्व ‘यूएसए! यूएसए!’च्या घोषणा देत होते.
या आंदोलनादरम्यान, काही आंदोलक आणि पोलिसांमध्ये हाणामारी झाली. परिस्थिती हाताबाहेर गेल्यावर नॅशनल गार्डला कॅपिटलच्या दिशेने रवाना करण्यात आले. रिपोर्ट्सनुसार, कॅपिटल इमारतीत एक अग्निशामक यंत्र फुटलं.
Donald Trump Hundreds Supporters Protest
संबंधित बातम्या :
अमेरिकेत हिंसाचार, डोनाल्ड ट्रम्प यांचे ट्विटर अकाऊण्ट लॉक, कायमस्वरुपी बंदीचा इशारा
अमेरिकेचे 46 वे राष्ट्रपती जो बायडेन यांना किती पगार मिळणार? जाणून घ्या