Donld Trump | खुर्ची सोडण्यापूर्वी ट्रम्प यांचा जो बायडन यांना झटका, सरकारी विमान प्रवास नाकारला

| Updated on: Jan 20, 2021 | 4:28 PM

नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडन (Joe Biden) यांची सरकारी विमानाची मागणी डोनाल्ड ट्रम्प यांनी फेटाळून लावली आहे. (Donald Trump Joe Biden)

Donld Trump | खुर्ची सोडण्यापूर्वी ट्रम्प यांचा जो बायडन यांना झटका, सरकारी विमान प्रवास नाकारला
डोनाल्ड ट्रम्प जो बायडन
Follow us on

वॉशिंग्टन : अमेरिकेचे मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जो बायडन यांना झटका दिला आहे. शपथविधी आणि स्वागताच्या कार्यक्रमासाठी डेलोवेयर ते वॉशिंग्टन प्रवासासाठी बायडन यांनी सरकारी विमान प्रवासाला मंजुरी देण्याची मागणी केली होती. मात्र, ट्रम्प यांनी बायडन यांची ही मागणी फेटाळून लावली आहे. बायडन यांनी वैयक्तिक विमानानं वॉशिंग्टनला पोहोचाव, अशी भूमिका ट्रम्प यांनी घेतली. बायडन यांना सरकारी विमान प्रवास नाकारण्याच्या निर्णयावरुन बायडन यांच्याविषयीची ट्रम्प यांची भूमिका बदलली नसल्याचं दिसून येते. (Donald Trump refused to provide government plane to joe biden)

जो बायडन यांनी पहिल्यांदा डेलोवेयर ते वॉशिंग्टन रेल्वे प्रवास करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, 6 जानेवारीला कॅपिटॉल बिल्डींगवर हल्ला झाल्यानंतर बायडन यांनी रेल्वे प्रवासाचा निर्णय रद्द केला. डेली मेलच्या वृत्तानुसार डोनाल्ड ट्रम्प यांनी बायडन यांनी वैयक्तिक विमानानं वॉशिंग्टनला यावी अशी भूमिका घेतली आहे. बराक ओबामांनी 2017 मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना एअर फोर्सचं विमान पाठवलं होतं.

जो बायडन भावूक

अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडन डेलोवयर सोडण्यापूर्वी दिवंगत मुलाच्या आठवणीत भावूक झाले होते. वॉशिंग्टनला जाण्यापूर्वी बायडन यांनी डेलोवेयरच्या नागरिकांना संबोधित केले.

20 मिनिटांच्या व्हिडीओत बायडन यांचा नामोल्लेख टाळला

अमेरिकेचे मावळते राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या निरोप भाषणाचा एक व्हिडीओ जारी केला. 20 मिनिटांच्या व्हिडीओमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी एकदाही जो बायडन यांचा उल्लेख केला नाही. या व्हिडीओमध्ये ट्रम्प त्यांच्या कार्यकाळातील ‘अमेरिका फर्स्ट’ धोरणाच्या यशाबाबत बोलताना दिसत आहेत. तसेच, “आम्ही जी चळवळ सुरु केली, ती फक्त एक सुरुवात आहे”, असंही ते म्हणाले.

डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅपिटॉल भवनात झालेल्या हिंसेचाही या भाषणादरम्यान उल्लेख केला. हे अमेरिकेच्या मूल्यांविरोधात असल्याचं त्यांनी म्हटलं. “कॅपिटॉल भवनवर झालेल्या हिंसेने प्रत्येक अमेरिकी नागरिक घाबरला होता. राजकीय हिंसा त्या सर्व मुल्यांवरील हल्ला आहे ज्या मुल्यांवर आपण जगतो. हे कधीही सहन केलं जाऊ शकत नाही. आता आम्हाला आधीपेक्षा जास्त एकत्र येण्याची गरज आहे”, असं ते म्हणाले.

संबंधित बातम्या

Donald Trump | खुर्ची सोडण्यापूर्वी ट्रम्प यांचा चीनला अजून एक झटका, कोणता मोठा निर्णय?

US Capitol | संसदेचं रुपांतर छावणीत, 20 हजार जवान तैनात, जवानांवर जमिनीवर झोपण्याची वेळ


(Donald Trump refused to provide government plane to joe biden)