वाशिंगटन: अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात काँग्रेस म्हणजेच हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हमध्ये महाभियोग प्रस्ताव मंजूर झालाय. मात्र, सिनेटमध्ये महाभियोगाची प्रक्रिया सुरु होऊन प्रस्ताव मंजूर व्हायचा आहे. मात्र, डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात महाभियोग प्रस्ताव मंजूर होण्याची शक्यता कमी आहे. सिनेटमध्ये महाभियोग प्रस्ताव मंजूर होण्यासाठी आवश्यक असणारे दोन तृतीयांश बहुमत डेमोक्रॅटिक पक्षाकडं नसून रिपब्लिकच्या सिनेटर्सचा पाठिंबा मिळणं अशक्य असल्याचं दिसत आहे. ( Donald Trump will get relief at Senate in Impeachment Proposal )
डेमोक्रॅटिक पक्षानं डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हमध्ये महाभियोग प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता. 6 जानेवारीला अमेरिकेच्या कॅपिटॉल बिल्डींगमध्ये झालेल्या हिंसाचाराला कारणीभूत असल्याचा ठपका ठेवत महाभियोग प्रस्ताव आणला गेला. अमेरिकेतील प्रचलित पद्धतीनुसार महाभियोग प्रस्ताव मंजूर करण्यासाठी दोन तृतीयांश सिनेटर्सचा पाठिंबा गरजेचा असतो. डेमोक्रॅटिक पक्षाला रिपब्लिकच्या 17 सिनेटर्सचा पाठिंबा मिळण्याची शक्यता कमी असल्याचं दिसत आहे.
अमेरिकेच्या 100 सदस्यांच्या सिनेटमध्ये रिपब्लिकचे 50 सदस्य आहेत तर डेमोक्रॅटिकचे 48 सदस्य असून इतर पक्षांचे दोन सदस्य आहेत. ट्रम्प यांच्यावर महाभियोग प्रस्ताव सिनेटमध्ये मंजूर होण्यासाठी डेमोक्रॅटिकला रिपब्लिकच्या 17 सिनेटर्सच्या पाठिंब्याची गरज आहे. रिपब्लिकचे सिनेटर जॉन बूजमॅन यांनी डेमोक्रॅटिक पक्ष 17 सिनेटर कसं जमा करणार असा प्रश्न विचारला आहे. रिपब्लिकच्या 45 सदस्यांनी डोनाल्ड ट्रम्प सध्या अध्यक्षपदावरुन पायउतार झाले असल्यानं महाभियोग प्रस्ताव चालवणं असंविधानिक असल्याचा दावा केला. तर, रिपब्लकचे सिनेटर केविन क्रोमर यांनी महाभियोग प्रस्तावाला उशीर करु नये, असं म्हटलं आहे.
सिनेटमधील नेते चक शूमर यांनी डोनाल्ड ट्रम्प यांनी आताच पद सोडलं आहे. त्यामुळे ट्रम्प यांच्याविरोधात महाभियोग प्रस्ताव पास केला जाऊ शकतो, असं म्हटलंय. डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठा अपराध केला आहे. सिनेट ट्रम्प यांच्या विरोधात प्रस्ताव दाखल करेल आणि निर्णय घेईल, असं म्हटलंय. सिनेटर रोजर विकार यांनी महाभियोग कारवाई करणं चूक असेल, असं म्हटलंय.
पहिला महाभियोग प्रस्ताव
डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात पहिला महाभियोग प्रस्ताव 2019 मध्ये आणला गेला होता. सत्तेचा गैरवापर केल्याप्रकरणी ट्रम्प यांच्याविरोधात काँग्रेसमध्ये रिपब्लिकचे बहुमत असल्यामुळे ठराव मंजूर होऊ शकला नाही आणि डोनाल्ड ट्रम्प वाचले होते.
लोकसभा निवडणुकीदरम्यान मोदी-शाहांवर घणाघात, आता शेतकरी आंदोलनावर राज ठाकरे काय बोलणार?https://t.co/qloarjbkdV#FarmersProstests | #MNS | #RajThackeray | #TractorRally @RajThackeray @mnsadhikrut
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 27, 2021
संबंधित बातम्या:
Trump Impeachment Updates: डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात महाभियोगाची कारवाई; प्रस्ताव बहुमताने मंजूर
कशी होते अमेरिकेच्या राष्ट्रपतींवर महाभियोगाची कारवाई?; ट्रम्प यांची हकालपट्टी होणार?
( Donald Trump will get relief at Senate in Impeachment Proposal )