Donald Trump | डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्षाच्या शर्यतीतून बाहेर! अमेरिकेच्या कोर्टाने दिला दणका

| Updated on: Dec 20, 2023 | 10:39 AM

Donald Trump | अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदासाठी गुडघ्याला बाशिंग लावून बसलेल्या माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना न्यायालयाने दणका दिला. कोलोरॅडो कोर्टाने त्यांना या पदासाठी अयोग्य ठरवले आहे. संयुक्त राज्य अमेरिकेच्या घटना दुरुस्तीच्या 14 व्या सुधारणेतील कलम 3 प्रमाणे त्यांना या पदासाठी कोर्टाने अपात्र ठरवले.

Donald Trump | डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्षाच्या शर्यतीतून बाहेर! अमेरिकेच्या कोर्टाने दिला दणका
Follow us on

नवी दिल्ली | 20 डिसेंबर 2023 : अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदासाठी गुडघ्याला बाशिंग लावून बसलेले डोनाल्ड ट्रम्प यांच्या मनसुब्यावर पाणी फेरले गेले. माजी राष्ट्राध्यक्षांना कोलोरॅडोच्या सर्वोच्च न्यायालयाने आगामी 2024 मधील निवडणुकीसाठी अपात्र घोषीत केले. 6 जानेवारी 2021 रोजी कॅपिटल हिंसाचार झाला होता. या प्रकरणात ट्रम्प यांना हा झटका बसला आहे. मंगळवारी हा निकाल देण्यात आला. न्यायालयाच्या या निकालामुळे सदर तरतुदीचा वापर करुन अपात्र ठरलेले ट्रम्प हे अमेरिकन इतिहासातील पहिले राष्ट्राध्यक्ष ठरले आहेत. बंडखोरी प्रकरणात ट्रम्प यांना हा झटका देण्यात आला आहे. अमेरिकन राज्यघटनेच्या 14 व्या दुरुस्तीमधील कलम 3 प्रमाणे ट्रम्प यांना राष्ट्राध्यक्ष पदासाठी अपात्र ठरवण्यात आले. सुप्रीम कोर्टाने त्यांच्या निकालावर 4 जानेवारीपर्यंत स्थगिती दिली आहे. या काळात ट्रम्प या निकालाला आव्हान देऊ शकतील.

रिपब्लिकन पक्षाला झटका

रिपब्लिकन पक्षात राष्ट्राध्यक्ष पदासाठी ट्रम्प यांचे पारडे जड मानण्यात येत होते. ते उमेदवारी अर्ज भरण्यासाठी पक्षाकडून पहिल्या पसंतीचे उमेदवार जवळपास निश्चित होते. पण सुप्रीम कोर्टाच्या या निकालाने रिपब्लिकन पक्षाला पण झटका बसला आहे. मिनेसोटा आणि मिशिगन येथील न्यायपालिकेतील ट्रम्प यांच्याविरोधातील खटले फेटाळण्यात आले आहे. तर काही राज्यात त्यांच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या नियुक्तीला आव्हान देण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा

मतदारांनी दाखल केला खटला

कोलोरॅडो येथील सहा मतदारांनी सप्टेंबरमध्ये हा खटला दाखल केला होता. त्यात ट्रम्प यांना 2024 मध्ये होणाऱ्या राज्यातील मतदानपासून रोखण्याची विनंती करण्यात आली होती. राज्य घटनेतील दुरुस्तीचा त्यासाठी दाखला देण्यात आला होता. ज्या व्यक्तीने यापूर्वी सर्वोच्च पदाची शपथ घेतली आणि नंतर अमेरिकेच्या विरोधात बंड अथवा बंडखोरी केली असेल, अशा व्यक्तीला या घटनादुरुस्तीतील कलम 3 प्रमाणे प्रतिबंध घालण्याची तरतूद आहे. त्याचा दाखला याचिकाकर्त्यांनी दिला होता. अमेरिकेच्या राजधानीत दंगल घडविण्यात ट्रम्प यांचे समर्थक मोठ्या संख्येने सहभागी होते, असा दावा याचिकेत करण्यात आला होता.

सुनावणीअंती अपात्र

अमेरिकन राज्यघटनेच्या 1868 मधील 14 व्या दुरुस्तीने ट्रम्प यांना झटका दिला. या अधिनियमातील कलम 3 प्रमाणे डोनाल्ड ट्रम्प यांना राष्ट्राध्यक्ष पदासाठी अपात्र ठरवण्यात आले. सुप्रीम कोर्टाने त्यांच्या निकालावर 4 जानेवारीपर्यंत स्थगिती दिली आहे. या काळात ट्रम्प या निकालाला आव्हान देऊ शकतील.