मंगळावरुन पृथ्वी कशी दिसते पाहिलात का? जगातला सर्वात वेगानं शेअर केला जाणारा फोटो पहा

| Updated on: Feb 24, 2021 | 11:21 PM

NASAच्या रोव्हरने पाठवलेले मंगळावरील काही फोटो समोर येत आहेत. त्यातील एक फोटो सध्या वेगानं पसरत आहे.

मंगळावरुन पृथ्वी कशी दिसते पाहिलात का? जगातला सर्वात वेगानं शेअर केला जाणारा फोटो पहा
Follow us on

मुंबई : अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था नासा (NASA)चं मंगळ मिशन मार्स पर्रिवरेंस (Mars Perseverance Rover) 18 फेब्रुवारीला रात्री अडीच वाजता मंगळ ग्रहावर यशस्वीरित्या उतरलं आहे. या मिशनमुळे अमेरिका आणि नासाचं नाव तर मोठं होतच आहे, त्याचबरोबर संपूर्ण जगालाही त्याचा फायदा होणार आहे. सध्या या रोव्हरने पाठवलेले मंगळावरील काही फोटो समोर येत आहेत. त्यातील एक फोटो सध्या वेगानं पसरत आहे.(Earth photo taken from Mars goes viral)

मंगळावरुन पृथ्वी कशी दिसत असेल, असा प्रश्न सर्वांनाच पडला असणार. या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या फोटोतून मिळतं. मंगळाच्या पृष्ठभागावरुन रोव्हरने घेतलेला हा फोटो अत्यंत मनमोहक आणि आकर्षक आहे. खगोलप्रेमींसाठी आणि खगोल अभ्यासकांसाठी तर हा फोटो एक पर्वणीच आहे. रेयान हॅक्चर या ट्विटर हँडलरने ट्वीट केलेला हा फोटो खूप वेगाने सर्वत्र पसरत आहे. या फोटोमध्ये पृथ्वी (Earth), शुक्र (Venus) आणि बृहस्पती (Jupiter) हे 3 ग्रह एका रेषेत पाहायला मिळत आहे.

या मोहिमेचा भारताला काय फायदा?

30 सप्टेंबर 2014 रोजी ISRO आणि NASA दरम्यान एक करार झाला होता. या करारानुसार मंगळावरील मोहिमेत एकसोबत काम करण्याचा मुद्दा होता. त्यावेळी ISRO चे प्रमुख डॉ. के. राधाकृष्णन हे होते. तर NASA च्या प्रमुखपदी चार्ल्स बोल्डेन हे होते. त्यावेळी NASAने मंगळावर मॅवेन आणि भारतानं मंगळयान पाठवलं होतं. टोरँटो इथं एका इंटरनॅशनल एस्ट्रॉनॉटिकल काँग्रेसमध्ये सहभागी होण्यासाठी गेलेल हे दोन्ही शास्त्रज्ञ वेगळ्या ठिकाणी भेटले. दोघांनी एका चार्टरवर स्वाक्षऱ्या केल्या. त्यानंतर NASA आणि ISROने मिळून एक वर्किंग ग्रुप बनवला. या कराराचा उद्देश दोन्ही संस्थांमधील सहयोगाचा चालना देणं हा होता. त्याचबरोबर भविष्यात एकत्रित मिळून मंगळ ग्रहावरील मोहीम आणि एकमेकांना उपयुक्त माहिती देणं हा होता.

त्याबरोबर NASA-ISRO सिंथेटिक अपर्चर रडार मिशनसाठीकी एक करार झाला. त्यानुसार ISRO आणि NASA मिळून 2022 मध्ये एक उपग्रह लॉन्च करणार आहेत. जो संपूर्ण जगाला अनेक प्रकारच्या नैसर्गिक आपत्तींपासून वाचवेल. हा जगातील सर्वात महाग अर्थ ऑबझर्व्हेशन उपग्रह असणार आहे. याची मोहिमेची अंदाजे किंमत 10 हजार कोटी रुपये असणार आहे.

भारताच्या मंगळयान-2 मोहिमेला मदत होणार

भारत मंगळयानाची तयारी करत आहे. असं मानलं जात आहे की यावेळी ISRO मंगळयान- 2 मध्ये मंगळावर लँडर पाठवणार आहे. जर भारताला 2024 मध्ये मंगळयान – 2 मंगळावर पाठवायचं असेल तर NASAच्या मार्स पर्सिवरेंस रोवरकडून मिळालेल्या आकडेवारीची गरज लागेल. भारताच्या मोहिमेला अद्याप 3 वर्षे बाकी आहे. तोपर्यंत NASA चं मार्स पर्सिवरेंस रोवर मोठ्या प्रमाणात माहिती पाठवेल. अशावेळी भारत आपल्या मोहिमेसाठी काही माहिती NASAकडे मागू शकतो. त्यामुळे भारताची मंगळयान – 2 मोहीम अधिक अचूक ठरण्यास मदत होईल.

नासाचं मंगळावर पोहचणारं पाचवं रोव्हर

मंगळावर पोहचल्यानंतर परसिव्हरन्स असं नववं अंतराळ रोव्हर असणार आहे (NASA Mars Mission Details). एका कारच्या आकाराचं प्लुटोनियम-पार्वड रोव्हर मंगळावर उतरणारं नासाचं पाचवं रोव्हर आहे. 23 कॅमेऱ्यांनी सज्ज असणारं नासाचं हे रोव्हर केवळ व्हिडीओ रेकॉर्ड करणार नाही, तर मंगळावरील आवाजही रेकॉर्ड करणार आहे. यासाठी त्यात खास दोन मायक्रोफोन लावण्यात आलेत.

इतर बातम्या :

Thalaivi | लवकरच ‘थलायवी’ प्रेक्षकांच्या भेटीला, ‘या’ तारखेला होणार प्रदर्शित

India vs England 3rd Test | मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची भविष्यवाणी, म्हणाला…

Earth photo taken from Mars goes viral