Earthquake in Afghanistan : विनाशकारी भूकंपात 1000 जणांना बळी, ढिगाऱ्याखाली दबून 1500 लोक जखमी

| Updated on: Jun 22, 2022 | 7:00 PM

युरोपीयन भूमध्य भूकंप विज्ञान केंद्र (EMSC) ने ट्विटमध्ये म्हटले आहे की, भूकंपाचे धक्के 500 किमी अंतरापर्यंत म्हणजेच पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि भारतातील सुमारे 119 दशलक्ष लोकांना जाणवले.

Earthquake in Afghanistan : विनाशकारी भूकंपात 1000 जणांना बळी, ढिगाऱ्याखाली दबून 1500 लोक जखमी
भूकंप
Image Credit source: tv9
Follow us on

काबूल : अफगाणिस्तानात (Afghanistan) बुधवारी पहाटे आलेल्या 6.1 रिश्टर स्केलच्या भूकंपामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अफगाणिस्तान आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी सांगितले की, भूकंपामुळे (Earthquake) देशाच्या पूर्वेकडील भागात मोठे नुकसान झाले आहे. तर या विनाशकारी भूकंपातील मृतांची संख्या 1 हजारांवर पोहोचली आहे. तर 1500 लोक जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. असोसिएटेड प्रेस या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या पूर्व अफगाणिस्तानच्या ग्रामीण आणि डोंगराळ भागात 6.1 रिश्टर स्केलचा हा भूकंप झाला. तसेच यूएस जिओलॉजिकल सर्वेने (US Geological Survey) सांगितले की, भूकंपाचा केंद्र बिंदू हा अफगानिस्तानच्या खोस्त शहरापासून 44 किलोमिटर दूर आणि 51 किमी खोल आहे. तर तालिबानी वृत्तपत्राने बचाव दल हे हेलिकॉप्टर ने येत असल्याचे म्हटलं आहे. दरम्यान तालिबान प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे प्रमुख मोहम्मद नसीम हक्कानी यांनी सांगितले की, पुष्टी झालेल्या मृत्यूंपैकी बहुतेक मृत्यू पक्तिका प्रांतात होते. जेथे 100 लोक मारले गेले आणि 250 जखमी झाले आहेत.

ते म्हणाले की, नांगरहार आणि खोस्ट या पूर्वेकडील प्रांतांमध्येही मृत्यूची नोंद झाली आहे. अधिकारी घटनास्थळी आहेत. अफगाणिस्तानमध्ये हा भूकंप अशा वेळी आला आहे जेव्हा अफगाणिस्तानला गंभीर आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. अमेरिकेच्या नेतृत्वाखालील आंतरराष्ट्रीय सैन्याने दोन दशकांच्या युद्धानंतर माघार घेतली. मात्र, तालिबान राजवटीच्या विरोधात अमेरिकेसह अनेक सरकारांनी अफगाणिस्तानच्या बँकिंग क्षेत्रावर विविध निर्बंध लादले आहेत. अब्जावधी डॉलर्सच्या विकास मदतीत कपात करण्यात आली आहे.

भारतापर्यंत भूकंपाचे धक्के

युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हे (यूएसजीएस) नुसार, आग्नेय अफगाणिस्तानमधील खोस्ट शहरापासून सुमारे 44 किमी (27 मैल) अंतरावर 51 किमी खोलीवर भूकंपाचा केंद्रबिंदू होता. तालिबान प्रशासनाच्या नैसर्गिक आपत्ती मंत्रालयाचे प्रमुख मोहम्मद नसीम हक्कानी यांनी सांगितले की, भूकंपामुळे किती नुकसान झाले आहे हे माहिती आल्यानंतरच कळेल. युरोपीयन भूमध्य भूकंप विज्ञान केंद्र (EMSC) ने ट्विटमध्ये म्हटले आहे की, भूकंपाचे धक्के 500 किमी अंतरापर्यंत म्हणजेच पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि भारतातील सुमारे 119 दशलक्ष लोकांना जाणवले. पाकिस्तानमध्ये कोणतेही नुकसान किंवा मृत्यू झाल्याचे तात्काळ वृत्त नाही. पाकिस्तानचा विचार करता, पेशावर, लाहोर, कोहाट, मोहमंद, स्वात, बुनेर आणि पंजाब आणि केपीच्या इतर भागांशिवाय पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले.