वॉशिंग्टन : SpaceX चे सीईओ एलोन मस्क यांच्यावर त्यांच्याच दोन महिला कर्मचाऱ्यांनी लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. या दोन महिलांमध्ये एक महाविद्यालयीन विद्यार्थी आहे. ती स्पेसएक्समध्ये इंटर्न होती. सेक्सच्या बदल्यात तिला घोडा विकत घेण्याची त्यांनी ऑफर दिली होती. तर, दुसरी महिला कर्मचारी याच्याशी शरीर संबध ठेवताना एलोन मस्क यांनी आपली मुले जन्माला घालण्यास सांगितले. एलोन मस्क यांच्यावरील या आरोपानंतर इतर अनेक माजी कर्मचाऱ्यांनीही मस्क यांच्यावर बेकायदेशीर औषधे (ड्रग्ज) वापरल्याचा आरोप केला.
वॉल स्ट्रीट जर्नल (WSJ) च्या एका विशेष रिपोर्टमध्ये SpaceX चे सीईओ एलोन मस्क यांच्यावर हे आरोप करण्यात आले आहेत. अब्जाधीशांनी त्यांच्या स्पेसएक्स आणि टेस्ला या दोन्ही कंपन्यांमध्ये एक अशी संस्कृती निर्माण केली आहे की ज्यामुळे महिला कर्मचाऱ्यांना अस्वस्थ वाटत आहे. बोर्ड सदस्यांसोबत काम करताना एलएसडी, कोकेन, एक्स्टसी, मशरूम आणि केटामाइन यांसारखी औषधे नियमितपणे वापरल्याचे आरोप करण्यात आले आहेत.
वॉल स्ट्रीट जर्नलच्या अहवालात अनेक स्फोटक दावे करण्यात आले आहेत. ज्यामध्ये मस्क यांच्यासोबत संबंध असल्याचा दावा करणाऱ्या चार महिलांच्या विधानांचा उल्लेख करण्यात आला आहे. मस्क यांच्यावर त्यांच्या दोन कर्मचाऱ्यांसोबत शारीरिक संबंध असल्याचा आरोप आहे. त्यापैकी एक SpaceX ची माजी इंटर्न आहे. एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीने SpaceX मध्ये काही सुधारणा करण्याच्या सूचना देण्यासाठी मस्क यांच्याशी संपर्क साधला. तिने सांगितले की त्यांच्या पत्रव्यवहारामुळे तारीख ठरली. नंतर चुंबन आणि शेवटी सेक्स झाला. मस्क यांनी त्या मुलीला सिसिली येथील एका रिसॉर्टमध्ये नेले आणि अधिकृत ब्रेकअपनंतरही त्यांचे नाते कायम ठेवले असा आरोप केला आहे.
मस्क यांच्या कार्यालयातील एका महिलेकडे त्यांनी आपल्यासाठी मुले जन्माला घालण्यास सांगितले. ज्या महिलेला एलोन मस्क यांनी आपले मूल जन्माला घालण्यास सांगितले होते तिने त्यांचे ऐकले नाही म्हणून तिला त्रास देण्यात आला. तर, एका महिलेला पगार वाढविण्याचे आश्वासन देऊन तिच्यासोबत शरीरसंबध निर्माण होते. मात्र, त्यानंतर त्या महिलेचा पगार न वाढवता तिच्या कामगिरीबद्दल तक्रार केली. वॉल स्ट्रीट जर्नलचा हा रिपोर्ट 48 हून अधिक लोकांच्या मुलाखतींवर आधारित आहे. यात महिलांचे मित्र आणि कुटुंबातील सदस्य तसेच माजी कर्मचारी यांचा समावेश आहे. तसेच, काही मजकूर संदेश, ईमेल आणि इतर दस्तऐवजांचा उल्लेख आहे.