फ्रान्सच्या अध्यक्षांना कोरोनाची लागण, लवकर रिकव्हर व्हा म्हणत मोदींचे फ्रेन्चमध्ये ट्विट

| Updated on: Dec 17, 2020 | 7:56 PM

फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन (Emmanuel Macron) यांना कोरोनाची लागण झाली आहे. (Emmanuel Macron corona positive)

फ्रान्सच्या अध्यक्षांना कोरोनाची लागण, लवकर रिकव्हर व्हा म्हणत मोदींचे फ्रेन्चमध्ये ट्विट
Follow us on

पॅरिस : फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन (Emmanuel Macron) यांना कोरोनाची लागण झाली आहे. मागील काही दिवसांपासून त्यांना कोरोनासदृश्य लक्षणं जाणवत होते. चाचणी केल्यानंतर त्यांना कोरोना संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले. सध्या मॅक्रॉन विलगिकरणात असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्रेन्च भाषेत ट्विट करत, मॅक्रॉन यांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. (Emmanuel Macron tested corona positive Narendra Modi prayed for speedy recovery)

फ्रान्समध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन फ्रान्समध्ये सध्या नाईट कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. जॉन्स हाफकिन्स विद्यापीठाने दिलेल्या आकड्यांनुसार फ्रान्समध्ये आतापर्यंत 24 लाखांपेक्षाही जास्त नागरिकांना कोरोनाची लागण झालेली आहे. तर आतापर्यंत एकूण 59 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार इमॅन्युएल मॅक्रॉन पुढचे सात दिवस विलगिकरणात राहणार आहेत. या काळात त्यांच्यावर उपचार करण्यात येतील. तसेच, ते विलगिकरणात राहून सर्व प्रशासनिक काम करणार आहेत. कोरोना विषाणूने आतापर्यंत अनेक देशांच्या अध्यक्षांना गाठलेले आहे. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, ब्राझीलचे राष्ट्रपती जायर बोलसेनारो यांनाही कोरोनाची लागण झालेली आहे. त्यानंतर आता फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांना कोरोनाची लागण झाली. दरम्यान आतापर्यंत जा राष्ट्रीय नेत्यांना

 

Wishing my dear friend @EmmanuelMacron a speedy recovery and the best of health.


दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इमॅन्यूएल मॅक्रॉन यांच्यासोबत कोरोना लसीविषयी चर्चा केली होती. त्यानंर मॅक्रॉन कोरोनाग्रस्त असल्याचे समजल्यानतंर मोदी यांनी यांच्या स्वास्थ्यासाठी प्रार्थना केली आहे. तसेच, लवकर रिकव्हर व्हा असे म्हणत त्यांनी मॅक्रॉन यांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

संबंधित बातम्या :

Uttar Pradesh Assembly Elections | उत्तर प्रदेशसाठी ओवेसींचा मोठा प्लॅन, योगींना टक्कर?

‘शेतकऱ्यांना आंदोलन करण्याचा पूर्ण अधिकार, त्यांना अडवू नका’, संयुक्त राष्ट्राकडूनही मोदी सरकारला कानपिचक्या

कॅनडाच्या पंतप्रधानांचा भारतातील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा, मोदी सरकार भडकलं

(Emmanuel Macron tested corona positive Narendra Modi prayed for speedy recovery)