केरमन | 03 जानेवारी 2024 : इराणच्या दक्षिणेकडील प्रांतात असलेल्या केरमान शहरातील माजी जनरल कासेम सुलेमानी यांच्या थडग्यावर दुहेरी बॉम्बस्फोटांनी पुन्हा इराणींना घायाळ केले. चार वर्षांपूर्वी याच दिवशी अमेरिकेने बगदादमध्ये ड्रोन हल्ल्यात सुलेमानी यांना ठार केले होते. सुलेमानी हा अमेरिकेच्या नजरेत दहशतवादी होता. परंतु इराणच्या हमास हिजबुल्ला या दहशतवादी संघटनांसाठी तो हिरो होता. अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे वकील आणि सिनेटर एलिझाबेथ यांच्यासह अनेक अमेरिकन अधिकार्यांची हत्या केल्यावर सुलेमानी अमेरिकेच्या नजरेत आला होता.
कासिम सुलेमानी त्यांच्या काळात इराणमधील सर्वात शक्तिशाली लोकांपैकी एक मानले जात. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खमेनी यांच्यानंतर देशातील दुसरा सर्वात मोठा नेता म्हणजे सुलेमानी. त्यांच्या हत्येच्या वर्धापनदिनानिमित्त शेकडो लोक केरमन शहरातील साहेब अल-जमान मशिदीजवळील समाधीवर श्रद्धांजली वाहण्यासाठी आले होते. हा सोहळा सुरू असतानाच अचानक मोठा स्फोट झाला. 10 मिनिटांनंतर दुसरा स्फोट झाला.
मिळालेल्या माहितीनुसार या हल्ल्यात आतापर्यंत 103 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 141 जण जखमी झाले आहेत. इराणने हा हल्ला दहशतवादी हल्ला असल्याचे म्हटले आहे. यानंतर इराणने आपल्या सैन्याला सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत.
सुलेमानी यांनी इराणी रिव्होल्युशनरी गार्ड्स कॉर्प्स (IRGC) मध्ये अल-कुद्स फोर्सचे नेतृत्व केले. ही तीच संघटना आहे ज्याला अमेरिकेने परदेशी दहशतवादी संघटना म्हणू घोषित केले आहे. 3 जानेवारी 2020 रोजी अमेरिकेने बगदादच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर IRGC कमांडर कासिम सुलेमानी यांना ड्रोन हल्ल्यात ठार केले. सुलेमानी यांनी ट्रम्प यांचे वकील रुडी जिउलियानी आणि सिनेटर एलिझाबेथ वॉरन यांच्यासह अमेरिकन सरकारी अधिकाऱ्यांची हत्या केल्याचे मानले जाते.
अमेरिकन अधिकाऱ्यांच्या हत्येनंतर अमेरिकेने त्यांना परदेशी दहशतवादी म्हणून घोषित केले. ट्रम्प यांनी अमेरिकन लष्कराला विशेष ऑपरेशन सोपवले. सुलेमानी यांच्या मृत्यूनंतर ट्रम्प म्हणाले होते की, ‘युद्ध थांबवण्यासाठी’ ही कारवाई करण्यात आली आहे. दुसरीकडे, संयुक्त राष्ट्रामध्ये इराणने या घटनेची तुलना ‘युद्ध सुरू करण्या’सोबत केली आहे.
सुलेमानी हे इराणमध्ये आदरणीय नेते म्हणून ओळखले जात. हमास आणि हिजबुल्ला या दहशतवादी संघटनांना मदत केल्याचा आरोपही त्यांच्यावर होता. सुलेमानी विशेषत: कुर्दिश सैन्याच्या गुप्त मोहिमांचे नेतृत्व करत. हमास आणि हिजबुल्लासह इतर दहशतवादी संघटना, सरकार आणि सशस्त्र गटांना निधी, पुरवठा, शस्त्रे, गुप्तचर सहाय्य आणि मार्गदर्शन करत असत.
2019 मध्ये अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष ट्रम्प यांनी इराणने आण्विक करार मोडल्यास त्याचा विनाश केला जाईल, अशी धमकी दिली होती. यावर सुलेमानी यांनी जर अमेरिकेने युद्ध सुरू केले तर ते आम्ही संपवू अशी उघड आव्हान दिले होते. केरमन शहरात झालेल्या दोन बॉम्बस्फोटांमुळे इराण हादरला आहे. या हल्ल्याची प्रत्यक्ष जबाबदारी अद्याप कोणीही घेतली नाही. तरी, या हल्ल्यानंतर अमेरिका आणि इराणमधील तणाव वाढण्याची भीती निर्माण झाली आहे.