इस्लामाबाद : पाकिस्तानचे (Pakistan) पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांनी बलात्कारावरुन वादग्रस्त केल्यानंतर त्यांची चांगलीच कोंडी झालीय. आधी स्वतःच्याच देशातून विरोध पाहावा लागलेल्या इम्रान खान यांना आता त्यांच्या घटस्फोटीत 2 पत्नींनी देखील चांगलंच सुनावलंय. जेमिमा गोल्डस्मिथ (Jemima Goldsmith) आणि रेहम खान (Reham Khan) असं इम्रान खान यांच्या घटस्फोटीत पत्नींची नावं आहेत. इम्रान यांनी बलात्काराच्या घटनांना अश्लिलता आणि पाश्चिमात्य संस्कृती आणि भारतीय संस्कृतीला जबाबदार असल्याचं विधान केलं होतं. त्यावरुन चांगलाच वाद उभा राहिलाय (Ex Wife criticize Imran Khan over controversial statement on rape).
वादग्रस्त वक्तव्यावरुन इम्रान यांची घटस्फोटीत पत्नी जेमिमा गोल्डस्मिथ ट्विट करत म्हणाल्या, “कुराणमध्ये पडद्याची जबाबदारी पुरुषांवर आहे. त्यामुळे यानुसार इम्रान यांनी आपल्या समर्थकांना स्वतःच्या डोळ्यावर संयम ठेवण्यास आणि खासगी अवयवांना पडद्यात ठेवण्यास सांगावं. मी ज्या इम्रानला ओळखत होते ते असं कधीच बोलत नव्हते. उलट ते पुरुषांना त्यांच्या डोळ्यांवर पडदा ठेवण्यास सांगत.”
इम्रानने आपलं तोंड बंद ठेवणं हेच सर्वांच्या भल्याचं, रेहम खानकडून सणसणीत कानउघाडणी
इम्रान यांची दुसरी घटस्फोटीत पत्नी आणि ब्रिटिश-पाकिस्तानी पत्रकार रेहम खान यांनी तर इम्रानला थेट तोंड बंद ठेवण्याचा सल्ला दिलाय. रेहम म्हणाल्या, “इम्रान जितकं कमी बोलती तितकं ते सर्वांसाठी चांगलं असेल.” रेहमने आपल्या ट्विटमध्ये जेमिमा यांच्यावरही निशाणा साधला. “आज एक तरुण मुलगी महिलांनी पडदा पद्धत बंद करावी म्हणत आहे. मात्र, हीच मुलगी पाकिस्तानमध्ये राहत असताना डोक्यापासून पायांपर्यत कपड्यांमध्ये झाकलेली दिसत होती.”
इम्रान खान नेमकं काय म्हणालेत?
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी रविवारी 2 तास नागरिकांशी फोनवर चर्चा करत त्यांच्या प्रश्नांना उत्तरं दिली. या दरम्यान एका नागरिकाने त्यांना सरकार बलात्कार आणि लहान मुलांच्या शोषणाच्या घटना रोखण्यासाठी काय उपाययोजना करत आहे असा प्रश्न विचारला. यावर इम्रान खान यांनी या घटनांबद्दल नाराजी व्यक्त करत निषेध केला. ते म्हणाले, “लैंगिक शोषण ‘अश्लीलते’मुळे होते. ही अश्लीलता पाश्चिमात्य आणि भारतीय संस्कृतीतून येते (Imran Khan on Indian Culture). यानंतर त्यांनी धर्मावर आपलं म्हणणं मांडत इस्लाम धर्मात बुरखा घालणं महत्त्वाचं असल्याचं मत व्यक्त केलं. यामुळे ‘प्रलोभनाला नियंत्रित’ करता येतं असा दावा त्यांनी केला.
हेही वाचा :
जगाची चिंता वाढवणाऱ्या सुएझ ब्लॉकप्रकरणी ‘या’ तरुणीवर आरोप, अखेर स्वतः समोर येऊन सत्य सांगितलं
बाल्कनीत न्यूड स्टंट, सोशल मीडियात व्हिडीओ व्हायरल; 12 महिलांना अटक
व्हिडीओ पाहा :
Ex Wife criticize Imran Khan over controversial statement on rape