मॉस्कोव : एकिकडे जगभरात कोरोनाने थैमान घातलेलं असताना आता दुसरं एक संकट घोंघावत आहे. पक्षांना होणाऱ्या बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव आता माणसांमध्येही होत असल्याचं समोर आलंय. रशियात माणसाला बर्ड फ्लूची बाधा झाल्याची नोंद झालीय. हा संसर्ग झाल्याचं स्पष्ट झाल्यानंतर रशियाने याबाबत जागतिक आरोग्य संघटनेला याबाबत माहिती देत अलर्ट केलंय. त्यामुळे कोरोनानंतर जगावर बर्ड फ्लूचं संकट ओढावणार का अशी शंका उपस्थित होत आहे (First Cases Of Bird Flu infection in Humans in Russia).
रशियातील संशोधकांना एका माणसात बर्ड फ्लूचा एक स्ट्रेन (H5N8) आढळला आहे. दक्षिण रशियातील काही पोल्ट्री वर्करमध्ये हा स्ट्रेन असल्याचा संशय होता. त्यामुळे संशोधकांनी अशा 7 कामगारांना वेगळं केलं होतं. असं असलं तरी संबंधित कामगारांची प्रकृती स्थिर आहे. कोणत्या या भागात डिसेंबर 2020 मध्ये बर्ड फ्लूचा मोठा संसर्ग झाला होता.
बर्ड फ्लू म्हणजे अॅव्हियन इनफ्लुयेंझा विषाणूचे अनेक उपप्रकार सापडले आहेत. यातील H5N8 हा पक्षांसाठी जीवघेणा ठरलाय. मात्र, हा विषाणू पक्षांमधून माणसात संसर्गित झाल्याचं याआधी एकही उदाहरण नव्हतं. रशियातील या संसर्गाने जागतिक आरोग्य संघटनेच्या चिंतेत वाढ झालीय. या नव्या माहितीने कोरोना नंतर माणसावर बर्ड फ्लूचं संकट ओढावण्याचा धोका वाढलाय.
सध्या संबंधित विषाणू माणसात संसर्ग होण्या इतपत सक्षम नसल्याचं संशोधकांनी म्हटलं. मात्र, या संसर्गाचा धोका ओळखून जगाने याला तोंड देण्यास तयार राहावं, असं मत रशियातील संशोधकांनी व्यक्त केलंय.
जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, संबंधित बर्ड फ्लूचा संसर्ग हा माणसातून माणसात झालेला नाही. माणसांचा बर्ड फ्लू झालेल्या पक्षांशी जवळून संबंध आल्यावर किंवा त्या परिसरात थांबल्यास बर्ड फ्लूचा संसर्ग होत आहे.
हेही वाचा :
बर्ड फ्लू नियंत्रणासाठी सरकारकडून पक्षांची हत्या, मात्र नुकसान भरपाई 2009 च्या तोकड्या दराने
Bird Flu | राज्यात पुन्हा बर्ड फ्लूचा उद्रेक, नंदुरबारमध्ये आणखी 6 लाख कोंबड्यांची किलिंग
महाराष्ट्रात बर्ड फ्लूमुळे कोणत्या पक्षाचे किती मृत्यू, राज्याची नेमकी स्थिती काय? वाचा सविस्तर…
व्हिडीओ पाहा :
First Cases Of Bird Flu infection in Humans in Russia