कंडोम, अंडरविअर आणि… विमानात लोक काय काय टाकून जातात; जे सापडलं ते धक्कादायकच

| Updated on: Feb 05, 2024 | 8:45 PM

अनेक लोक विमानाने प्रवास करतात. हजारो लोक येतात जातात. त्यातील काही चांगले लोक असतात तर काही विचित्र. या विचित्र लोकांचं वागणं, त्यांच्या तऱ्हाही विचित्रच असतात. फ्लाइट अटेंडंटना त्याचा अनुभव येत असतो. त्यांना त्याचा त्रासही होत असतो. कारण लोक असं काही फ्लाईटमध्ये टाकून जातात की या फ्लाईट अटेंडेंटंचीही तळपायाची आग मस्तकात जाते...

कंडोम, अंडरविअर आणि... विमानात लोक काय काय टाकून जातात; जे सापडलं ते धक्कादायकच
Flight Attendant
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

वॉशिंग्टन | 5 फेब्रुवारी 2024 : ऐकावं ते नवलंच असतं. जगात अनेक लोक आहेत. त्यांच्या तऱ्हाही तितक्याच विचित्र आहेत. त्याची प्रचिती फ्लाईट अटेंडेंटनाही येत असते. या अटेंडेंट्समध्ये महिला आणि पुरुष दोन्ही असतात. पण आपल्याला फक्त माहीत असतात त्या फक्त एअर होस्टेस. एका फ्लाइट अटेंडेंटने प्रवाशांबाबतची धक्कादायक माहिती दिली आहे. एका अमेरिकन एअरलाइन्ससाठी या फ्लाइट अटेंडेंटने काम केलंय. त्यांच्या 25 वर्षाच्या करिअरमधील सर्वात बेक्कार गोष्टींचा त्यांनी खुलासा केला आहे. त्यांचा हा खुलासा ऐकून सर्वांनाच धक्का बसला असून लोक हे वास्तव ऐकून आश्चर्य व्यक्त करत आहेत.

सोशल मीडिया साईट रेडिटवर या फ्लाइट अटेंडेंटने धक्कादायक खुलासा केला आहे. आस्क मी एनिथिंग सेशनमध्ये त्यांनी ही माहिती दिली आहे. कंडोम, घाणेरड्या अंडरविअर आणि वापरलेल्या टॅम्पोन सापडल्याचं या अटेंडेंटने सांगितलं. तसेच त्याबाबतची माहितीही दिली. फ्लाइंट अटेंडेंटच्या तणावाचं मुख्य कारण पॅसेंजर आहेत. पॅसेंजर कुणाचंच ऐकत नाही. त्यांना सांगितलेलं करत नाहीत. अनेकांना तर आम्ही वारंवार टॉयलेटमध्ये स्मोकिंग करताना पकडलं आहे. असं करणं किती धोकादायक आहे हे सांगूनही लोक ऐकत नाहीत, असं त्यांनी सांगितलं.

बेवड्यांचा त्रास

नशेत असताना गोंधळ घालणाऱ्या प्रवाशांबद्दलही त्यांनी सांगितलं. सहा महिन्यातून एक तरी व्यक्ती नशेत असलेला आढळायचा आणि गोंधळ करताना भेटायचा. वारंवार नाही. पण सहा महिन्यातून एकदा तरी असा प्रवासी भेटायचाच हे मी ठामपणे सांगतो. पण तुम्ही कोणत्या शहरातून उड्डाण करता यावरही बरंचसं अवलंबून आहे. उदाहरणच द्यायचं झालं तर लाग वेगासमध्ये अनेक बेवडे फ्लाईटमध्ये चढतात, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

सर्वात वाईट अनुभव

तुम्ही कधी सहकाऱ्यासोबत किंवा प्रवाशासोबत वेळ घालवलाय का? असा सवाल एका यूजर्सने केला. त्यालाही या फ्लाइट अटेंडेंटने उत्तर दिलं आहे. प्रवाशासोबत वेळ घालवाल. सहकाऱ्यांनी मला ऑफर्स दिल्या होत्या. पण त्यांच्यासोबत नाही, असं ते म्हणाले. गेल्या 25 वर्षातील काही घाणेरडे अनुभवही त्यांनी सांगितले. प्रवाशांचं आपल्या जागेवरून भांडणं, जागेवरच बसून टॉयलेट करणं अशा गोष्टी आम्ही पाहिल्या. एका प्रवाशाने तर माझ्यावर थुंकण्याचाही प्रयत्न केला होता. पण हे सर्व करूनही पगार अत्यंत कमी मिळतो. जे नवीन आहेत, त्यांना तर अधिकच कमी मिळतो, असंही त्यांनी सांगितलं.