व्हीएन्ना | 5 ऑगस्ट 2023 : एकीकडे रशिया आणि युक्रेनमध्ये युद्धसुरु असल्याने तेथील अनेक लहानमुलांचे भावविश्व उद्धवस्थ झाले आहे. अनेकांची घरे बॉम्बवर्षावात सुरुंग स्फोटात, रणगाड्यांच्या तोफगोळ्यांच्या माऱ्यात नष्ट झाली आहे. युक्रेनमधील या लहान मुलांना फुटबॉल खेळाने एकत्र आणले आहे. ऑस्ट्रियन स्पोर्ट्स रिसॉर्ट या संस्थेने ऑस्ट्रियातील ओबेट्राऊन येथे युद्धग्रस्त युक्रेन येथील लहानमुलांसाठी फुटबॉलचे सामने आयोजित केले होते. ही मुले आपले दु:ख विसरुन फुटबॉल खेळताना अगदी रममाण झाली होती. खेळाला कोणत्याही सीमा नाहीत. तो केवळ आनंद पसरवितो असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
ऑस्ट्रियन स्पोर्ट्स रिसॉर्ट या संस्थेने युद्धभूमी युक्रेन ते ऑस्ट्रियातील ओबेट्राऊन या शहरात या लहानमुलांना आणून त्यांच्यात फुटबॉलचे सामने खेळवले आणि या युद्धाच्या चिंतेने ग्रासलेल्या त्यांच्या चेहऱ्यावर अवखळ हसु उमले आहे. वॉर झोन युक्रेनमधून ही मुले थेट फुटबॉलच्या मैदानावर हसत खिदळत आहेत हे मोठे आश्वासक चित्र आहे. यातील अनेक मुलांची घरे युद्धात पडली आहेत. त्यांचा दु:ख आणि चिंता खेळाने दूर केली आहे.
लहान मुले फुटबॉलला किक मारीत गोल करीत आहे. खेळ हा जगात सर्वौच्च आहे, खेळच संपूर्ण जगाला एकत्र आणेल हा विश्वास आहे. या मुलांच्या चेहऱ्यावर पुन्हा हसु आले आहे. आमच्या या छोट्याशा प्रयत्नाने हे युद्ध थांबेल अशी आशा असल्याचे ऑस्ट्रियन स्पोर्ट्स रिसॉर्टचे व्यवस्थापकीय संचालक एड्रीज होलझींगर यांनी म्हटले आहे. तर लहानमुले ही शांततेची सदिच्छादूत आहेत, जगाचे भविष्य आहेत. खेळाला कोणतीही सीमा नसल्याचे फुटबॉल फिलॉसोफर कौशिक मौलिक यांनी म्हटले आहे.