नवी दिल्ली – काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) सध्या त्यांच्या खासगी नेपाळ (Nepal) दौऱ्यावर आहेत. त्याची एक नेपाळी मैत्रिण आहे. तिचं नाव सुमनिमा उदास (Sumnima Udas) आहे. राहूल गांधी हे मैत्रीणीच्या लग्नासाठी काठमांडूला गेले आहेत. राहूल गांधी यांचा नेपाळ दौऱ्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये राहुल गांधी एका नाईट क्लबमध्ये दिसत आहेत. हा नाईट क्लब लॉर्ड ऑफ द ड्रिंक्स म्हणून ओळखला जातो. काठमांडू पोस्टच्या बातमीनुसार, सोमवारी काठमांडू विमानतळावर पोहोचल्यानंतर राहुल गांधी आपल्या तीन साथीदारांसह मॅरियट हॉटेलमध्ये थांबले आहेत. राहूल गांधी हे त्यांच्या नेपाळची मैत्रिण सुम्निमा उदास हिच्या लग्नात सहभागी होण्यासाठी आले आहेत.
सुमनिमाचे वडील आणि नेपाळचे म्यानमारमधील राजदूत आहेत. त्यांचं नाव भीम उदास आहे. “आम्ही राहुल गांधींना माझ्या मुलीच्या लग्नात येण्याचे निमंत्रण दिले होते.’ मंगळवारी लग्नसोहळा होणार असून 5 मे रोजी रिसेप्शन होणार असल्याचे त्यांनी सांगितले. सुमनिमाचे लग्न निमा मार्टिन शेर्पासोबत होत आहे. या लग्नसोहळ्यासाठी अनेक महत्त्वाच्या भारतीय सेलिब्रिटीही पोहोचल्या आहेत.
सुमनिमा उदास यांनी अमेरिकेतील विद्यापीठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवी घेतली आहे. तसेच ऑक्सफर्ड विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी घेतली आहे. त्यांनी सीएनएन इंटरनॅशनलसाठी बातमीदार म्हणून काम केले आहे. राजकारण, आर्थिक-सामाजिक, पर्यावरण आणि सामान्य समस्या त्यांनी अधिक कव्हर केल्या आहेत. सुमनिमाने ‘दिल्ली गँगरेप’ प्रकरणातही तक्रार नोंदवली होती.
सुमनिमा यांना तिच्या पत्रकारितेच्या काळात अनेक पुरस्कार सुध्दा मिळाले आहेत. 2014 मध्ये त्यांना अमेरिकन जर्नलिस्ट ऑफ द इयरचा पुरस्कारही मिळाला होता. याशिवाय सुमनिमाला सिने गोल्डन ईगल पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे. सध्या सुमनिमा लुंबिनी संग्रहालय उपक्रमाच्या संस्थापक आणि कार्यकारी संचालक आहेत.