लाहोर : चित्र विचित्र घटनामुळे पाकिस्तान नेहमीच चर्चेत असतो. पाकिस्तानात सध्या बकरी ईदची धामधुम सुरु आहे. अशातच पाकिस्तानचा माजी क्रिकेटरसोबतही विचित्र घटना घडली आहे. पाकिस्तानचा माजी क्रिकेटर कामरान अकमलची(Former Pakistan cricketer Kamran Akma) बकरी चोरीला गेली आहे. कामरान याने ईदला कुर्बानी(Bakari Eid) देण्यासाठी रही बकरी आणली होती.
बकरी ईद आधीच पाकिस्तानच्या या माजी क्रिकेटरला मोठा धक्का बसला आहे. पाकिस्तानचा माजी क्रिकेटर कामरान अकमलची बकरी चोरीला गेल्याची घटना घडली. चोरीला गेलेला बोकड खरेदी करून बकरी ईदला कुर्बानीसाठी घरी आणण्यात आला होते.
बकरी ईदेपूर्वीच चोरट्यांनी कामरान अकमलची बकरी चोरून नेली आहे. कामरान अकमलच्या घरी यावर्षी बकरीदला 6 बकऱ्यांचा बळी दिला जाणार होता, मात्र त्यापैकी एक चोरीला गेला आहे. यामुळे कामरान नाराज झाला आहे. सोशल मीडियावर ही बातमी चागंलीच व्हायरल झाली आहे.
कामरान अकमलच्या वडिलांनी बकरीदला कुर्बानी देण्यासाठी आधीच बाजारातून 6 बकरे खरेदी केले आहेत. या बकऱ्या त्यांनी घराबाहेर बांधल्या होत्या. पहाटे तीनच्या सुमारास चोरट्यांनी कामरान अकमल यांची बकरी चोरून नेली.
विशेष म्हणजे या बकऱ्या पाळण्यासाठी कामरान याच्या वडिलांनी एक माणूसही कामावर ठेवला आहे. शेळी पाळण्यासाठी ठेवलेली व्यक्ती रात्री झोपली असताना चोरट्यांनी डाव साधला. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत चोरट्यांनी कामरान याची एक बकरी चोरून नेली.
कामरान अकमलची शेळी चोरीला गेल्याची माहिती गृहनिर्माण संस्थेच्या व्यवस्थापनाला देण्यात आली आहे. चोरांना लवकरात लवकर पकडले जाईल आणि त्यांची चोरी झालेली बकरी परत मिळवून दिली जाईल, असे आश्वासन त्यांनी कामरान अकमलच्या कुटुंबीयांना दिले आहे.