नवी दिल्ली : एका लहानशा खेडापाड्यात, डोंगरदऱ्यात राहणारा एक मुलगा चीनमध्ये जाऊन सुपरस्टार होऊ शकतो का? एखाद्या चित्रपटाप्रमाणे कथेप्रमाणे वाटणारी ही कथा रिअल लाईफमध्येही खरी ठरली आहे. एका खेडेगावात राहणाऱ्या तरुणाने चीनच्या चित्रपटसृष्टीत वेगळी ओळख निर्माण केली आहे. देव रातूरी असे या तरुणाचे नाव आहे. (From waiter in India to film star in China The inspiring journey of Dev Raturi)
देव हा चीनी सिनेसृष्टीतील एक महत्त्वाचा चेहरा आहे. त्याने 2015 पासून आतापर्यंत 20 चीनी चित्रपट आणि वेबसीरीजमध्ये काम केले आहे. लियू ताओ, वू गँग, झांग जिन, ली झिटिंग आणि किओ झेंयू यांसारख्या लोकप्रिय चिनी कलाकारांसोबत त्याने स्क्रीन शेअर केली आहे.
हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम
देव रातुरी हा उत्तराखंडच्या उत्तर-पूर्व राज्यातील टिहरी गढवाल जिल्ह्यातील कॅमरसौड या दुर्गम भागातील रहिवाशी आहे. त्याने फक्त दहावी पर्यंतचे शिक्षण घेतले आहे. देवने पोटापाण्यासाठी हॉटेलमध्ये वेटर म्हणूनही काम केले आहे. शिक्षण झाल्यानंतर 1995 मध्ये देव हा रोजगारासाठी नवी दिल्लीत आला. या ठिकाणी तो दरमहिना 400 रुपयाची नोकरी करायचा. यावेळी पैशासाठी त्याने घरोघरी दूधविक्री केली, गाय-म्हशींना अंघोळ घातली. हॉटेलमध्ये खुर्च्या टेबलही साफ केले. पण त्याच्यातील कलाकार जिवंत होता.
1988 मध्ये देव रातुरी हा मुंबईत निघून आला. यावेळी त्याने भाऊ चित्रपट अभिनेता पुनीत इस्सर याचा ड्राईव्हर म्हणून नोकरी केली. त्यादरम्यान त्याच्या आयुष्यात टर्निंग पाईंट आला. 2005 मध्ये त्याला चीनच्या शिआन शहरात वेटरची नोकरी मिळाली. त्यानंतर देवने अथक मेहनत घेत चीनी भाषाचे ज्ञान घेतले.
यानंतर 2013 मध्ये त्याने जर्मन रेस्टॉरंट आणि अमेरिकन रेस्टॉरंटमध्येही काम केले. त्यावेळी त्याचा पगार लाखो रुपये होते. यानंतर 2013 मध्ये त्याला शिआनमध्ये एक रेस्टॉरंट उघडण्याची संधी मिळाली. पण त्याच्या जवळच पैसे नव्हते. त्यानंतर त्याने आपल्या जुन्या बॉसची आर्थिक मदत घेतली. रेस्टॉरंट सुरू झाल्यानंतर त्याच्या यशाची दरवाजेही उघडलं. देव रातुरी 24 वर्षांच्या अथक परिश्रमानंतर चीनमधील 7 रेस्टॉरंट्सचे मालक बनले आहेत. ते रेड फोर्ट नावाचे चार आणि अंबर नावाचे तीन अशा प्रसिद्ध रेस्टॉरंट्सची साखळी चालवत आहे.
देवने चीनमध्ये बर्याच चित्रपटांमध्ये काम केले आहे, एवढेच नव्हे तर देव यांना हॉलिवूड चित्रपट ‘आयरन स्काय’ मध्येही काम करण्याची संधी मिळाली. तो बिग हार्बर नावाची एक टीव्ही मालिका देखील केली आहे. देव हे कदाचित चीनचे प्रसिद्ध व्यापारी झाले असेल, तरी त्याचे खेड्यापाड्यावरील प्रेम कसूभरही कमी झालेले नाही.
त्यांना आता भारतात 500 कोटींची गुंतवणूक करायची आहे. यासाठी ते सतत प्रयत्न करत असतात. अलीकडेच त्यांनी पर्यटन सचिव दिलीप जावळकर यांचीही भेट घेतली. त्यांना आपली योजना सांगा. चिनी उद्योजकांचे एक शिष्टमंडळ ऑक्टोबरमध्ये दून येथे येईल, त्यानंतरच पुढील नियोजन केले जाईल. (From waiter in India to film star in China The inspiring journey of Dev Raturi)
संबंधित बातम्या :
मंगळावरुन पृथ्वी कशी दिसते पाहिलात का? जगातला सर्वात वेगानं शेअर केला जाणारा फोटो पहा
टिंडरवर सुंदर महिलेचा मोह महागात पडला, गळ्यावर चाकू ठेवत 55 लाख रुपयांची लूट