‘गेम ऑफ थ्रोन्स’ च्या सिंहासनाचा किती कोटींना झाला लिलाव? अवघ्या सहा मिनिटांत बोली लागली

| Updated on: Oct 19, 2024 | 9:10 PM

गेम ऑफ थ्रोन्स या गाजलेल्या वेबसिरीजमधील वस्तूंचा लिलाव करण्यात आला आहे. या सिरीजमधील आर्यन थ्रोनचा लिलावात कोट्यवधी रुपयांना करण्यात आला असून एकूण 100 हून अधिक वस्तूंचा लिलाव झाला आहे.

गेम ऑफ थ्रोन्स च्या सिंहासनाचा किती कोटींना झाला लिलाव? अवघ्या सहा मिनिटांत बोली लागली
game of thrones
Follow us on

‘गेम ऑफ थ्रोन्स’ वेब सिरीजबद्दल माहिती नसेल असा विरळाच असेल, प्रचंड गाजलेल्या या वेब सिरीजची कथा  जॉर्ज आर.आर.मार्टीन यांच्या प्रसिद्ध कांदबरी ‘ए सॉन्ग ऑफ आइस एंड फायर’ च्या कथानकावर बेतलेली आहे. या संपूर्ण वेबसिरिजचे कथानक एका गुढ अशा सिंहासनाच्या अवती भोवती फिरत असते. या सिंहासनाला आयर्न थ्रोन म्हटले जाते. जे तलवारींना वितळवून तयार केलेले असते. टारगेरियन घराण्याने तयार केलेले हे सिंहासन सात राज घराण्याचे नेतृत्व करते. त्यामुळे या सिंहासनाला प्राप्त करण्यासाठी या सिरीजमधील प्रत्येक व्यक्ती रेखा लढत असते आणि रक्ताचे पाट वाहत असते.

‘गेम ऑफ थ्रोन्स’ या वेब सिरीजमध्ये उभारलेल्या या सिंहासनाचा लिलाव करण्यात आला त्याला त्याला कोट्यवधीची बोली लागली आणि हे सिंहासन अवघ्या सहा मिनिटात विकले गेले. चला तर पाहूयात काय नेमके घडले. अमेरिकेचे शहर डलास येथील एका हेरिटेज नावाच्या संस्थेने गेम ऑफ थ्रोन्स या सिरीजशी संबंधित अनेक वस्तूंचा लिलाव केला आहे.यात 100 हून अधिक वस्तूंचा समावेश होता. आयर्न थ्रोन देखील या लिलावात सहभागी होते. लोकांनी या सिंहासनाला विकत घेण्यासाठी कोट्यवधीची बोली लावण्यास सुरुवात केली. अवघ्या सहा मिनिटात सर्वौच्च बोलीत हे सिंहासन विकले गेले.

4,500 लोकांचा सहभाग

तीन दिवस चाललेल्या या लिलावात गेम ऑफ थ्रोन्सच्या 100 हून अधिक वस्तूंचा लिलाव जवळपास 1 अब्ज रुपयांना झाला. या लिलावात 4,500 लोकांनी सहभाग घेतला होता. एकट्या आयर्न थ्रोनचा लिलाव 12 कोटी रुपयांना झाला. आर्यन थ्रोन जसे लिलावात आले तसे त्याची बोली पटापट लागली. सहा मिनिटांत सर्वौच्च बोली 12 कोटीची लागली आणि हे सिंहासन विकले गेले. एनबीसी न्यूयॉर्क यांच्या बातमीनुसार या लिलावात 4,500 हून अधिक लोकांनी सहभाग घेतला आणि 1 अब्ज रुपये यांवर खर्च करण्यात आले. आयर्न थ्रोन शिवाय यात जॉन स्नो याची लोकप्रिय तलवार लॉन्गक्ला तीन कोटींना विकली गेली. ज्यांनी ही वेबसिरीज पाहीली असेल त्यांना माहिती असेल की ही तलवार नाईट वॉचच्या प्रमुखाने ही तलवार जॉन स्नोला दिली होती, जी वॅलेरियन स्टीलपासून बनली आहे. तर या मालिकेतील एक व्हीलन सेर्सी हीने घातलेला लाल मखमली पोशाख एक कोटी रुपयांना विकला गेला. हा पोशाख तिने मृत्यू समयी घातला होता.