Germany : जर्मनीत ख्रिसमसच्या आनंदावर विरजण, बाजारातील लोकांना कार खाली चिरडलं, 11 लोकांचा बळी घेणारा हा जल्लाद डॉक्टर कोण?

| Updated on: Dec 21, 2024 | 9:17 AM

Germany Christmas market Attack : जगभरात नाताळाचा उत्साह पाहायला मिळत आहे. तर जर्मनीत या आनंदावर विरजण पडले आहे. सौदी अरबच्या एक माथेफिरूने जर्मनीतील मॅगडेबर्ग येथील ख्रिसमस मार्केटमध्ये कार घुसवून लोकांना चिरडले. त्यात 11 जणांना जीव गमवावा लागला.

Germany : जर्मनीत ख्रिसमसच्या आनंदावर विरजण, बाजारातील लोकांना कार खाली चिरडलं, 11 लोकांचा बळी घेणारा हा जल्लाद डॉक्टर कोण?
जर्मनी कार अपघात
Follow us on

जर्मनीमधील पूर्व भागातील शहर मॅगडेबर्ग येथे दहशतवादी हल्ला झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. येथे सौदी अरबच्या एक माथेफिरूने जर्मनीतील मॅगडेबर्ग येथील ख्रिसमस मार्केटमध्ये कार घुसवून लोकांना चिरडले. त्यात 11 जणांना जीव गमवावा लागला. तर 80 पेक्षा अधिक नागरिक हे गंभीर जखमी झाले आहे. त्यातील अनेकांची स्थिती चिंताजनक असल्याचा दावा करण्यात येत आहे. हा दहशतवादी हल्ला आहे का, याचा पोलीस आणि तपास यंत्रणा चौकशी करत आहे. ख्रिसमसची खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली होती. आपल्यावर असा हल्ला होईल, याची पुसटशी कल्पना पण येथील नागरिकांना नव्हती. जर्मनीने सीरीया आणि आखाती देशातील अनेक निर्वासितांना आश्रय दिला आहे, त्याचे त्यांना परिणाम भोगावे लागत असल्याचा आरोप युरोपमधील स्थानिकांनी केला आहे.

शुक्रवारी केला हल्ला

पोलिसांनी सांगीतले की शुक्रवारी संध्याकाळी 7 वाजता हा हल्ला करण्यात आला. जर्मनीतील मॅगडेबर्ग येथील ख्रिसमस बाजारात अनेक जण नाताळाच्या खरेदीसाठी आले होते. त्यावेळी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. एक भरधाव कार या लोकांना चिरडत पुढे गेली. त्यावेळी एकच आरडाओरड झाली. नागरिक जीव वाचवण्यासाठी सुरक्षित ठिकाणी पळाले. बाजारातील पोलिसांनी आरोपीला तात्काळ अटक केली. हा दहशतवादी हल्ला असल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे. घटनेनंतर बाजार बंद करण्यात आला.

हे सुद्धा वाचा

आरोपी आहे तरी कोण?

कार चावलणारी व्यक्तीची ओळख पटवण्यात आली आहे. त्याचे नाव तालेब असे आहे. तो सौदी अरबचा नागरिक आहे. तो 50 वर्षांचा आहे. तो मॅगडेबर्गपासून जवळपास 40 किलोमीटर दक्षिणेकडील बर्नबर्ग या ठिकाणी वैद्यकीय तज्ज्ञ म्हणून काम करतो. डॉक्टर तालेब हा 2006 मध्ये जर्मनीत आला होता. 2016 मध्ये त्याला निर्वासिताचा दर्जा मिळाला होता. आरोपी हा सॅक्सोनी-एनहाल्ट येथील रहिवाशी आहे. ज्या कारने हा अपघात घडवण्यात आला. ती त्याने म्यूनिख येथून भाडे तत्वावर खरेदी केली होती.

या घटनेनंतर स्थानिक पोलिसांनी त्याला तात्काळ कारमधून खाली ओढले. त्याच्यावर पोलीस बंदुक रोखून असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून येते. दरम्यान सौदी अरबने या घटनेची निंदा केली आहे. मयतांच्या कुटुंबियाच्या दुःखात आपला देश सहभागी असल्याचे निवेदन या देशाने दिले आहे. अशा हल्ल्याचा तीव्र निषेध सौदीने केला आहे.