या बिकनीच्या किंमतीत येतील 2 मर्सिडीज कार, काय खास आहे या बिकनीत ?

| Updated on: Jul 29, 2024 | 10:28 PM

अमेरिकेच्या हेरिटेज ऑक्शन हाऊसने ही बिकिनी 1 कोटी 46 लाख रुपयांची बोली लावत विकत घेतल्याचे वृत्त आले तेव्हा साऱ्यांनाच धक्काच बसला. जगभरात या बिकिनीची चर्चा आहे. तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले.

या बिकनीच्या किंमतीत येतील 2 मर्सिडीज कार, काय खास आहे या बिकनीत ?
princess leia star wars gold bikini
Follow us on

एखाद्या वस्तूची किंमत कधी वाढेल ते सांगता येणार नाही. एखाद्या बिकनीची किंमत असून असून किती असणार 200 ते 500 रुपये. परंतू आम्ही ज्या बिकनीची गोष्ट करीत आहोत त्याची चर्चा संपूर्ण जगात सुरु आहे. कारण या बिकनीला लिलावत 1.46 कोटी रुपयांची बोली मिळाली आहे. ही काही सामान्य बिकनी नाही. या बिकनीला इतकी किंमत मिळण्यामागे तिच्या मागचा एक इतिहास आहे. या लेखात आपण पाहूयात या बिकनीला इतका भाव मिळाला ते…

काय खास या बिकनीत

ही काही साधीसुधी बिकनी नाही. तिला एकेकाळी या गाजलेल्या स्टारवॉर मालिकेत प्रसिद्ध अभिनेत्री कॅरी फिशर हीने या बिकनीला घातले होते. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे ही बिकनी सोन्याची आहे.वास्तविक जेव्हा स्टार वॉर्समध्ये अभिनेत्री कॅरी हीने ‘प्रिंसेस लिया’ हे कॅरेक्टर साकारले होते. त्या कॅरेक्टरसाठी खास ही बिकनी तयार करण्यात आली होती. या मालिकेत ही बिकनी कॅरी फिशर हीने परिधान केली होती. या बिकनीसह या चित्रपटातील एक खास सीन देखील शुट केला होता.

जेव्हा ‘रिटर्न ऑफ द जेडी’ या चित्रपटात कॅरीचे कॅरेक्टर जब्बा द हटच्या सिंहासनावर बसेल तेव्हा कॅरीचे करेक्टर याच बिकनीत होते. बिकनी शिवाय प्रिन्सेस लियाचे कॅरेक्टर ज्या पोशाखात होते. त्यात एकूण 7 कपडे असतात. यात एक बिकनी ब्रेसियर, बिकनी प्लेट, हिप रंग, एक बाजूबंद आणि बांगडीचा देखील समावेश होता. या पोशाखाचे डिझाईन औद्योगिक लाईट एंड मॅझिकचे मुख्य मूर्तिकार रिचर्ड मिलर यांनी केले होते.

कोणी लावली बोली

अमेरिकेच्या हेरिटेज लिलावात या बिकनीला 1 कोटी 46 लाखात खरेदी केले. आणि संपूर्ण जगात या बिकनीची चर्चा सुरु झाली. सोशल मीडियावर या बिकनीचा फोटो व्हायरल होऊ लागली..याच सोबत या रिटर्न ऑफ द जेडी फिल्मचा तो सीन देखील व्हायरल होऊ लागला. ज्यात अभिनेत्री कॅरी फिशर हीने ही सोन्याची बिकनी परिधान घेतली होती. या बिकनीबद्दल बोलले जाते की या बिकनीबाबत एक बाब प्रसिद्ध आहे. ती म्हणजे स्टार वॉर्समध्ये परिधान केलेल्या सर्वात लोकप्रिय आणि प्रसिद्ध पोशाखापैकी एक आहे.

कॅरीला हा ड्रेस आवडला नव्हता

अभिनेत्री कॅरीने परिधान केलेला ड्रेस जगभरात चर्चेचा विषय बनला होता, पण कॅरीला तो अजिबात आवडला नव्हता. साल 2016 मध्ये एका मुलाखतीत कॅरी म्हणाली होती की, तिला चित्रपटात ही सोन्याची बिकिनी घातली आहे असे वाटले नाही. जेव्हा तिला या ड्रेसबद्दल पहिल्यांदा सांगण्यात आले, तेव्हा तिला वाटले की डायरेक्टर तिच्यासोबत जोक करीत आहे. परंतू, नंतर कॅरीला एका खास दृश्यात हा ड्रेस घालावा लागेल असे निश्चित झाले तेव्हा तिला हे खरे वाटले. आज कॅरी या जगात नाही. पण तिने परिधान केलेला हा ड्रेस आजही चर्चेत आहे.