नवी दिल्ली : देशात सोन्याच्या किंमतींनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. सोन्याची किंमत (Gold Price) गगनाला भिडली आहे. गेल्या 11 वर्षांत सोने दुप्पट झाले आहे. तर चांदीने अनेक रेकॉर्ड तोडले आहेत. गेल्या दिवाळीनंतर सोन्याने पुन्हा जोरदार चढाई केली. या तीन महिन्यात सोन्याने दोनदा विक्रम केला आहे. 2 फेब्रुवारी 2023 आणि 5 एप्रिल 2023 या दिवशी सोन्याने नवीन रेकॉर्ड (Gold New Record) गाठले. भारतीय सर्वसामान्य खरेदीदार त्यामुळे हिरमुसले आहे. पण सध्या महागाईचा (Inflation) आगडोंब उसळलेल्या पाकिस्तानमध्ये एक तोळा सोन्याचा भाव (Gold Price Pakistan) किती आहे, माहिती आहे का? या शेजारी देशात भरड गव्हाचे पीठच इतके महागले असताना सोन्याच्या किंमती काय असतील नाही?
आज काय भाव
गुडरिटर्न्सनुसार, 27 एप्रिल रोजी, सकाळच्या सत्रात 22 कॅरेट सोन्यात प्रति तोळा 10 रुपयांची दरवाढ झाली.
10 ग्रॅम सोन्याचा भाव 56,110 रुपये तर 24 कॅरेटचा भाव 10 रुपयांनी वधारुन 61,200 रुपये प्रति तोळ्यावर आला. सोन्याचा भाव कालपेक्षा जवळपास 100 रुपयांनी वधारला आहे.
चांदीची रॉकेट भरारी
यावर्षी चांदी आणि सोन्याच्या किंमतींनी जवळपास 11 टक्क्यांची उसळी घेतली. पण सोन्याच्या वाढत्या भावामुळे ग्राहक, खरेदीदारांचा हिरमोड झाला आहे. त्यामुळे त्यांनी चांदीकडे मोर्चा वळविला आहे. चांदीत येत्या काही दिवसांत मोठी तेजी दिसू शकते. चांदीची मागणी वाढली आहे. चांदीच्या किंमती 9-12 महिन्यात वाढून 85,000 ते 90,000 रुपये प्रति किलोवर पोहचतील, असा अंदाज आहे. त्यामुळे चांदीच्या किंमतीत 20 टक्क्यांची तेजी दिसून येईल.
11 वर्षांत भाव डबल
पाकिस्तानमध्ये सोन्याचा भाव काय
डेली पाकिस्तानने पाकिस्तानमधील सोन्याच्या भावाची माहिती दिली आहे. त्यानुसार, गुरुवारी पाकिस्तानमध्ये 24 कॅरेट एक तोळ्याचा भाव 2,19,000 पाकिस्तानी रुपये आहे. तर 22 कॅरेट एक तोळा सोन्याचा भाव 2,00,199 पाकिस्तानी रुपये आहे. पाकिस्तानमधील लाहोर, कराची, इस्लामाबाद, पेशावर, क्वेटा, सियालकोट, अटक, गुजरणवाला, मुल्तान, गुजरात, चकवाल यासह अनेक शहरात हाच भाव आहे.
पाकिस्तानी चलनाचे मूल्य काय
एका डेटानुसार, भारतीय 100 रुपयांचे पाकिस्तानी रुपयातील मूल्य 345 रुपयांच्या आसपास आहे. तर एका डॉलरसाठी 283.48 पाकिस्तानी रुपये मोजावे लागतात. तर एक डॉलरसाठी भारतीयांना 82 रुपये मोजावे लागतात. यावरुन पाकिस्तानमधील सोन्याचे मूल्य, किंमत लक्षात येईल.