जीपीएस लोकेशनमुळे अनेकदा कार चालक वाट चुकल्याच्या अनेक घटना घडलेल्या आहेत. यापूर्वी दक्षिण भारतातील केरळात जीपीएस यंत्रणेवर विसंबल्याने कार चालक थेट नदीच्या पात्रात गेल्याच्या घटना घडल्या आहेत. परंतू कारचे इंधन संपल्याने जीपीएस बंद पडले, त्यामुळे वाट चुकल्याने मृत्यू ओढल्याची घटना सौदी अरबमध्ये घडली आहे. सौदीत अरेबियातील राहणाऱ्या भारतीय तंत्रज्ञांचा कारचे इंधन संपल्याने GPS बंद पडल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. हा 27 वर्षीय भारतीय तंत्रज्ञ त्याच्या सहकाऱ्यासह एका कारमधून सौदीतील रुबा अल-खली वाळवंटात चुकल्याने दोघांचा देखील मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
मूळचे तेलंगणातील करीमनगरात राहणारे शाहबाज खान हे सौदीत टॉवर टेक्निशियन म्हणून काम करीत होते. शाहबाज आणि त्यांचे सहकारी पाच दिवसांपूर्वी रुटीन एसाईमेंटसाठी कारने प्रवास करीत होते. त्यावेळी त्यांनी GPS ने त्यांच्या कारची दिशा भरकटवल्याने ते थेट रुबा अल-खली वाळवंटात गेले. तेथे त्यांच्या कारचे इंधन देखील संपल्याने त्यांच्यावर मोठा बाका प्रसंग ओढवला. त्यानंतर सौदी प्रशासनाला दोघाचे निपचित पडलेले मृतदेहच हाती लागले.
कारचे इंधन संपल्याने जीपीएस यंत्रणेचा वापर करता येत नसल्याने कारची दिशा चुकली आणि शाहबाज खान आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा मृत्यू झाला. जीपीएस शिवाय त्या दोघांना दिशा शोधणे जमले नाही. आणि त्याची कार सौदीतील रुबा अल-खली वाळवंटात अडकली.वाळवंटात त्यांच्या मोबाईलचे नेटवर्क देखील बंद पडले आणि वाळवंटातील प्रचंड तापमान आणि उष्णतेमुळे डिहायड्रेशन होऊन या दोघांचा मृत्यू झाला असावा असे म्हटले जाते.
रुबा अल-खली वाळवंटाला एम्प्टी क्वार्टर देखील म्हटले जाते. चार देशांमध्ये पसरलेले हे वाळवंट अत्यंत प्रतिकूल परिस्थितीसाठी कुप्रसिद्ध आहे. वाळवंटात मानवी वस्ती, उंट आणि वन्यजीव नसल्याने हरवलेल्या प्रवाशांना मदत मिळणे किंवा भूप्रदेशात शोधणे जवळजवळ अशक्य असते. पाणी किंवा अन्न नसताना आणि कडक उन्हामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे म्हटले जात आहे. शाहबाज आणि त्याच्या साथीदाराचा अशाप्रकारे मृत्यू ओढवल्याने हळहळ व्यक्त होत आहे.