नवी दिल्ली | 23 ऑक्टोबर 2023 : धर्माच्या नावाखाली माथी भडकविणारे नामानिराळे राहतात आणि सामान्य जनता मात्र अंधकारात युद्धात होरपळत असल्याचे गाझापट्टीचे वास्तव झाले आहे. इस्रायलवर अमानुष हल्ला केल्याने युद्ध पेटले असून हमासच्या अतिरेक्यांना कायमचा धडा शिकविण्यासाठी इस्रायली सैन्याने मैदानी लढाईचे बिगुल वाजविले आहे. परंतू ‘द संडे टाईम्स’च्या वृत्तानूसार वेस्ट बॅंकमध्ये कारवाया करणारा हमासचा दहशतवादी मोहम्मद कासिम सवाल्हा हा लंडनमध्ये ब्रिटीश सरकारशी संबंधित बंगल्यात ऐशोआराम झोडत आहे. हमासचा प्रमुख इस्माईल हनिया देखील असाच गाझाबाहेर कतारमध्ये रहात असल्याचे म्हटले जाते.
ब्रिटीश वृत्तपत्र ‘द संडे टाईम्स’ने हमासचा म्होरक्या मोहम्मद कासिम सवाल्हा बाबत नवा मोठा खुलासा केला आहे. मोहम्मद कासिम लंडनच्या बार्नेट येथील आलिशान बंगल्यात रहात आहे. या बंगल्याचे कनेक्शन ब्रिटनसरकारशी आहे. ब्रिटीश ज्यू लोकसंख्येपैकी 20 टक्के लोकसंख्या बार्नेट येथे रहाते असे म्हटले जाते. कासिम याने बार्नेट मध्ये अलिकडेच 3.24 कोटी रुपयांची बानर्टे काऊन्सिलची संपत्ती खरेदी केली आहे. मिळालेल्या नूसार ही संपत्ती खरेदी करण्यासाठी ब्रिटनच्या राइट-टू-बाय योजनेंतर्गत त्याला 1.13 कोटीची सूट देण्यात आल्याचे वृत्तात म्हटले आहे. दो मजल्याचा हा आलिशान बंगला असून बगिचा आणि एक गॅरेज देखील आहे. कासिम त्याची पत्नी सावन हिच्या सोबत या लक्झरीय बंगल्यात राहत आहे. याआधी देखील ब्रिटनमधील इस्रायलशी संबंधित वकीलांनी साल 2020 मध्ये कासिमच्या या पार्श्वभूमीविषयीची माहीती दहशतवाद विरोधी पोलिसांना पुरविली होती. आता कासिम याने प्रतिबंधत्माक नियमांचे उल्लंघन केले आहे का याची चौकशी केली जाणार आहे.
ब्रिटनच्या वृत्तपत्रात ही बातमी आल्यानंतर ब्रिटीश अधिकाऱ्या या प्रकरणाची चौकशी सुरु केली आहे. ब्रिटनचे एक नेते बॅरी रॉलिंग्स यांनी म्हटले आहे की आम्ही हा विचार करून भयभयीत झालोय की कासिम आमच्याच येथे रहात आहे. आम्ही याची चौकशी सुरु केल्याचे त्यांनी सांगितले. संपूर्ण प्रकरणाची चौकशी करुन पोलिस आणि सरकारशी संपर्क करून उचित कारवाई केली जाईल असे रॉलिंग्ज यांनी स्पष्ट केले आहे.
दहशतवादी कासिम सवाल्हा हा 1990 च्या दशकात एका नातेवाईकाच्या पासपोर्टचा वापर करून ब्रिटनमध्ये दाखल झाला होता. तेव्हापासून तो त्याच्याजवळ ब्रिटनचे नागरिकत्व असल्याचे सांगत आहे. हमास ही ब्रिटनमध्ये बंदी घातलेली संघटना आहे. त्यामुळे हमासशी संबंध स्पष्ट झाल्यास त्याला दहशतवाद अधिनियमानूसार 14 वर्षांची शिक्षा होऊ शकते.