मुंबई | 13 ऑक्टोबर 2023 : इस्रायल आणि हमास यांच्यात युद्ध सुरु असताना आता जगातील सर्व देशातून प्रतिक्रीया येत आहेत. फ्रान्सने देखील या प्रकरणावर आपली भूमिका मांडली आहे. फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रों यांनी हमास संघटनेवर मोठा शाब्दीक हल्ला केला आहे. मॅक्रों यांनी म्हटले आहे की हमास एक अतिरेकी संघटना आहे. ही संघटना इस्रायलचा विनाश करु इच्छीत आहे. ही संघटना गाझाच्या लोकांचा बुरखा फाडत आहे. फ्रान्सच्या राष्ट्रपतीची ही प्रतिक्रीया अशा वेळी आली आहे जेव्हा इस्रायल आणि हमास युद्धावर जग दोन ध्रुवात वाटले गेल्याचे चित्र आहे. अमेरिका आणि ब्रिटननंतर फ्रान्सच्या या कठोर टीकेने इस्रायलला आत्मबळ मिळाले आहे. तर मध्य-पूर्व देशांमध्ये खळबळ उडाली आहे.
आतापर्यंत अमेरिका आणि ब्रिटन या दोन देशांनी इस्रायलचे केवळ खुले समर्थनच केले नाही तर त्यांच्या मदतीला आपले सेन्य आणि हत्यारे पाठविली आहेत. यानंतर फ्रान्सच्या राष्ट्रपतींनी केलेल्या वक्तव्याने ते सुद्धा इस्रायलला मदत करण्याच्या शर्यतीत मागे राहू इच्छीत नाहीत. आतापर्यंत भारतासह जगभरातील सर्व मोठ्या देशांनी हमासला अतिरेकी संघटना म्हटले आहे. तर मध्य-पूर्वेतील देश हमासला स्वातंत्र्याची लढाई लढणारे क्रांतीकारक मानत आहेत.
फ्रान्सच्या राष्ट्रपतींचे ट्वीट –
Hamas is a terrorist organization.
Above all, its seeks the destruction and death of Israel. It exposes, in a criminal and cynical way, the people of Gaza.
— Emmanuel Macron (@EmmanuelMacron) October 12, 2023
7 ऑक्टोबरपासून इस्रायलवर हमासने हल्ला केल्यानंतर इस्रायलने प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे. इस्रायलची सेनेने गाझापट्टी बेचिराख करुन टाकली आहे. इस्रायल आणि गाझापट्टीत आतापर्यंत 4000 हून अधिक लोक ठार झाले आहेत. तर दहा हजाराहून अधिक लोक जखमी झाले आहेत. इस्रायलने काल रात्रीपासून हमासचा सर्वोच्च नेता याह्या सिनेवार याच्या पाच ठिकाणांवर हल्ला केला आहे. याह्याने या हल्ल्याची योजना आखल्याचे इस्रायल आर्मी प्रमुखाचे म्हणणे आहे. इस्रायलने साडे तीन लाख राखीव सैन्य जमा केले असून जमीनी युद्ध सुरु करण्याची योजना आखली आहे.