न्यूयॉर्क | 5 फेब्रुवारी 2024 : सामान्यतः ट्रक ड्रायव्हरचे काम फक्त पुरुषच करतात. त्यांचे जीवन अनेक अडचणींनी भरलेले असते. अनेक दिवस कुटुंबापासून दूर राहावे लागते. त्यामुळे अशा कामापासून महिला चार हात लांब दूरच असतात. पण, अशीही एका महिला आहे की कोणत्याही मिस वर्ल्डला लाजवले असं देखणं सौंदर्य तिला लाभलं. एखाद्या चित्रपटातील नायिकेसारखीच दिसायला ती सुंदर आहे. पण, तिची खरी ओळख आहे ती जगातील सर्वात ग्लॅमरस ट्रक ड्रायव्हर. डेसेन हॅवॉक असे या २५ वर्षीय महिलेचे नाव आहे.
डेसेन हेवॉक ही मूळची यूएसए इलिनॉयची. डेसेन हिला खर तर जिम्नॅस्ट बनायचे होते. पण, एका किरकोळ अपघातामुळे तिचे ते स्वप्न उद्ध्वस्त झाले. तिला जिम्नॅस्टिकपासून दूर राहावे लागले. अशा परिस्थितीत तिने स्वतः ट्रक चालवण्यास सुरुवात केली. ट्रक ड्रायव्हरचे काम करून डेसेन वर्षाला सुमारे 1 कोटी रुपये कमावते.
गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये देसेन जिथे काम करत होती ती कंपनी बंद झाली. त्यामुळे तिला नोकरी गमवावी लागली. तिची कारकीर्द तात्पुरती थांबली. पण आता ती पुन्हा नव्या नोकरीवर रुजू झाली आहे. डेसेन सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. इंस्टाग्रामवर तिचे 10 हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत. तर, टिकटॉकवर फॉलो करणाऱ्यांचीही संख्या काही कमी नाही.
डेसेन हिने मला पुन्हा ट्रक ड्रायव्हरची नोकरी मिळाली आहे असा व्हिडिओ केला. त्याला 1 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. नोकरी गमावल्यानंतर सौंदर्य पाहून अनेक लोकांनी चुकीच्या गोष्टींसाठी संपर्क साधला. पण, मी त्या सर्व अनोळखी लोकांना चोख प्रत्युत्तर दिले, असेही तिने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
डेसेन हिचे अनेक चाहते तिच्या फोटो आणि व्हिडिओंवर कमेंट करतात. कोणी तिला ग्लॅमरस म्हणतो तर कोणी तिला सुंदर म्हणतो. देसेनही तिच्या फॉलोअर्सना उत्तर देत असते. सर्वात ग्लॅमरस ट्रक ड्रायव्हर अशा डेसेन हिने तिचा सीव्ही भव्य शैलीत सादर केला आहे. 4 वर्षांचा दीर्घ प्रवासाचा (ओटीआर) अनुभव आहे ज्यामध्ये कोणताही अपघात झाला नाही. मात्र, वेगाने गाडी चालविल्याबद्दल चलन मिळाल्याची कबुली तिने दिलीय.
डेसेनने सांगितले की, अनेक चाहत्यांनी मला ओन्लीफॅन्सवर खाते तयार करण्यास सांगितले. परंतु, मी तसे केले नाही. माझ्या आईला हे सर्व आवडत नाही. आईने मला सोशल साइट्सवर आपले खासगी आयुष्य कधीही उघड करू नये असे बजावले आहे. विशेष म्हणजे डेसेन हिने सोशल मीडियावरून किंवा वाईट मार्गाने एक पैसाही कमावलेला नाही. जे काही ती कमावत आहे ते तिच्या मेहनतीच्या बळावरच. ट्रक चालक म्हणून ती दरमहा लाखो रुपये कमवते.