Israel Hezbollah War : मेसमध्ये सैनिक जेवतानाच ड्रोन हल्ला, हिजबुल्लाहचा इस्रायलला सर्वात मोठा झटका, अनेक जखमी

| Updated on: Oct 14, 2024 | 9:30 AM

Israel Hezbollah War : हिजबुल्लाहने ज्या ड्रोनने इस्रायलवर हल्ला केला ते रशियन ड्रोन असल्याचे सांगितले जात आहे. घातपाताचा विचार केला तर इस्रायलवरील हिजबुल्लाहचा हा सर्वात प्राणघातक हल्ला आहे. रशियाच्या ड्रोन हल्ल्याने इस्रायल-लेबनॉन युद्धात रशियाचा प्रवेश स्पष्ट झाला आ

Israel Hezbollah War : मेसमध्ये सैनिक जेवतानाच ड्रोन हल्ला, हिजबुल्लाहचा इस्रायलला  सर्वात मोठा झटका, अनेक जखमी
हिजबुल्लाहचा इस्रायलला मोठा झटका
Image Credit source: social media
Follow us on

हिजबुल्लाह आणि इस्रायलदरम्यान सुरू असलेलं युद्ध आता प्राणघातक होत आहे. दोन दिवसांत हिजबुल्लाने इस्रायलवर ड्रोन हल्ले केले आहेत. इस्रायलच्या हैफा शहराच्या दक्षिणेकडील बिन्यामिना लष्करी तळाला हिजबुल्लाहने ड्रोनने लक्ष्य केलं. रविवारी झालेल्या या हल्ल्यात 4 इस्रायली सैनिक ठार झाले असून 67 च्या आसपास सैनिक जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. इस्रायलवरील हिजबुल्लाहचा हा सर्वात प्राणघातक हल्ला आहे. यामधील चिंतेची बाब म्हणजे हा हल्ला रोखणयात एअर डिफेन्स सिस्टीम पूर्णपणे अपयशी ठरली. एवढेच नव्हे तर हवाई हल्याच्या सा.यरनही वाजला नाही.

हिजबुल्लाहने ज्या ड्रोनने इस्रायलवर हल्ला केला ते रशियन ड्रोन असल्याचे सांगितले जात आहे. घातपाताच्या दृष्टीने पहायला गेलं तर हा इस्रायलवरील आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला आहे. रशियन ड्रोन हल्ल्याने इस्रायल-लेबनॉन युद्धात रशियाचा प्रवेश स्पष्ट झाला असून आता इराणच्या शस्त्रास्त्रांबरोबरच हिजबुल्लाहकडे रशियन शस्त्रेही आहेत.

लेबनॉनमध्ये इस्रायली हल्ल्यांचा बदला

दक्षिण लेबनॉनमध्ये इस्रायली हल्ल्याचा बदला असे हिजबुल्लाहच्या या हल्ल्याचे वर्णन करण्यात आलं आहे. हा हल्ला झाला तेव्हा इस्रायली सैनिक मेसमध्ये जेवण करत होते. या हल्ल्यात जखमी झालेल्या लोकांना सुमारे 50 रुग्णवाहिकांमधून 7 रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

या कारवाईनंतर हिजबुल्लाहने एक निवेदन जारी करून हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. “इस्लामिक रेजिस्टेंस रविवार, 13 ऑक्टोबर 2024 रोजी संध्याकाळी एक ऑपरेशन केले, ज्यामध्ये हैफाच्या दक्षिणेकडील बिनयामिना येथील गोलानी ब्रिगेडच्या ट्रेनिंग कँपवर (प्रशिक्षण शिबिरावर) ड्रोनचा एक स्क्वॉड्रन लाँच करत हल्ला करण्यात आला,” असे त्यात नमूद करण्यात आले.

हिजबुल्लाहने पुन्हा दिला इशारा

या हल्ल्यानंतर हिजबुल्लाहने पुन्हा एकदा धमकी दिली असून इस्त्रायली सैन्य हैफामधील काही वस्त्यांमधील घरे स्वत:साठी वापरत असल्याचे म्हटले.

“लेबनॉनच्या आक्रमणासाठी ऑपरेशन रूम म्हणून वापरले जाणारे इस्रायली तळ हैफा आणि तबरैया सारख्या दाट लोकवस्तीच्या शहरांमध्ये आहेत. अशी सर्व घरे आणि लष्करी तळ हे इस्लामिक प्रतिकाराच्या रॉकेट आणि हवाई दलांचे लष्करी लक्ष्य आहेत. त्यामुळे, पुढील सूचना मिळेपर्यंत आम्ही येथील रहिवाशांना त्यांचे प्राण वाचवण्यासाठी या लष्करी ठिकाणांजवळ एकत्र न येण्याचा इशारा देत आहोत, ” असे हिजबुल्लाहच्या निवदेनात नमूद करण्यात आलं आहे