इराणच्या पाठिंबा असलेल्या हेजबोला अतिरेकी संघटनेकडून वाढता धोकापाहून रविवारी इस्रायलने लेबनॉनवर मोठे हवाई हल्ले केले होते. या हल्ल्याचे प्रत्युत्तर लागलीच हेजबोलाने दिले असून इस्रायलच्या सैनिकी तळांवर तीनशेहून अधिक रॉकेट डागले आहेत. हेजबोलाने हे हल्ले मुद्दामहून इस्रायलच्या सैनिक तळांवर केलेले आहेत. कारण त्यांना इस्रायलची एअर डिफेन्स सिस्टीमला बाद करायचे आहे.आमच्या हल्ल्याचा पहिला राऊंड संपला आहे असे हेजबोलाने जाहीर केले आहे.याचा अर्थ त्यांचा दुसरा राऊंड देखील होऊ शकतो आणि तो अधिक खतरनाक असू शकतो असे म्हटले जात आहे. आम्ही आमचा सैनिक कमांडर फुआद शुक्र यांच्या हत्येचा बदला घेतला असल्याचे हेजबोला या संघटनेने म्हटले आहे.
हेजबोला आणि इस्रायल यांच्यातील संघर्षाने आता जवळपास युद्धाचे स्वरुप घेतले आहे. लेबनॉन सीमेवर दोन्ही बाजूंनी हल्ले होत आहेत. रविवारी पहाटे इस्रायलने हेजबोलाच्या तळांवर रॉकेट हल्ले केल्यानंतर हेजबोलाने देखील बदला घेतला आहे. हेजबोलाने 320 रॉकेट डागले आहेत. हेजबोवाने हल्ल्यानंतर एक संदेश जारी केला आहे. आम्ही आमचा सैन्य कमांडर फवाद शुक्र यांच्या हत्येचा बदला घेतला आहे. आम्ही इस्रायलच्या सैनिक तळांवर लक्ष्य ठेवून तीनशेहून अधिक रॉकेट्सने हल्ला केला आहे. म्हणजे पुढे इस्रायलच्या एअर डिफेन्सला भेदने आम्हाला शक्य होणार आहे. आमचा पहिला टप्पा संपल्याचे देखील हेजबोलाने जाहीर केले आहे. त्यामुळे हेजबोला दुसरा टप्पा देखील सुरु करु शकतो अशी शंका आता सर्वांना आहे.
हेजबोलाने इस्रायलच्या आयरन डोम प्लॅटफॉर्म आणि अन्य 11 इस्रायली तळ आणि बॅरेकवर 320 हून अधिक कत्युशा रॉकेटडागली आहेत. यात मेरोन बेल आणि गोलान हाईट्सच्या चार तळांचा समावेश आहे. हेजबोलाच्या या हल्ल्याचा अंदाज इस्रायलला आधीच होता.त्यामुळे रविवारी पहाटे इस्रायलने हेजबोलाच्या ठिकाणांवर जोरदार हल्ले केले होते.
इराणची राजधानी तेहरान येथे हमासचा राजकीय प्रमुख इस्माईल हानिया आणि हेजबोला कमांडर फवाद शुक्र यांची हत्या केल्यानंतर इराण आणि हेजबोला यांनी इस्रायलवर हल्ला करुन बदला घेण्याची शपथ घेतली होती. इस्रायलला कोणत्याही हल्ल्यापासून बचावाचा अधिकार आहे असे अमेरिकेने स्पष्ट केले आहे. अमेरिकेने आपले विमानवाहू युद्ध नौका या भूमध्य सागरात आणल्या आहेत. हेजबोलाच्या ताज्या हल्ल्यानंतर अमेरिकेच्या व्हाईट हाऊसने प्रतिक्रिया दिली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष सध्याच्या परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहेत, इस्रायलला स्वत:च्या सुरक्षेचा संपूर्ण अधिकार असल्याचे व्हाईट हाऊसने म्हटले आहे.
इस्रायलने दक्षिण लेबनॉनमध्ये अतिरेकी संघटनेच्या तळांवर हवाईतून जमीनीवर हल्ला करणारी 40 मिसाईल डागली आहे. याचे प्रत्युत्तर देताना हेजबोलाने लेबनॉनवरुन इस्रायली क्षेत्रात 320 हन अधिक कत्युषा रॉकेट डागली आहेत. आम्हाला त्रास दिला आम्ही सोडणार नाही असे इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांनी म्हटले आहे.