बलुचिस्तानः पाकिस्तानात असणाऱ्या हिंदूंविषयी अनेकदा सकारात्मकतेच्या बातम्या आल्या असल्या तरी तेथील काही कट्टरतवादी संघटनेकडून कोणत्या ना कोणत्या प्रकारचा त्रास दिला जातोच. त्यामुळे आता नुकतीच एक घटना समोर आली आहे. पाकिस्तानमधील (Pakistan) बलुचिस्तान प्रांतात राहणाऱ्या अल्पसंख्याक हिंदू समुदायातील (Hindu community) एका महिलेचा मृत्यू झाला. त्यानंतर तेथील हिंदू नागरिकांनी महिलेवर अंत्यसंस्कार केले. मात्र अंत्यसंस्कारानंतर अज्ञात लोकांकडून स्मशानभूमीतील राख विसकटून टाकण्यात आली होती. त्यामुळे तेथील अल्पसंख्याक हिंदू समाजाने घडलेल्या घटनेबद्दल निषेध व्यक्त केला.
सोमवारी प्रसारमाध्यमांमध्ये दिलेल्या बातम्यांमध्ये हिंदूंसोबत एकोप्याची भावन दाखवत, मुस्लिम धर्मगुरू आणि राजकीय पक्षांचे नेत्यांकडूही या आंदोलनात सहभाग नोंदवण्यात आला. यावेळी त्यांनी प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजीही केली गेली.
पाकिस्तानातील डॉन वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार हिंदू समाजातील एक प्रतिनिधीने सांगितले की, नुकतेच एका हिंदू महिलेचा मृत्यू झाला होता. त्यानंतर त्यांच्यावर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यानंतर अंत्यसंस्कार केलेल्या जागी असलेली मृतदेहाची राख काही अज्ञात व्यक्तींकडून ती इकडे तिकडे फेकून देण्यात आली.
या प्रकरणाच्या निषेधार्थ रविवारी हिंदू समाजातील अनेक नागरिकांनी शहरातील मुख्य रस्त्यावर उतरुन मोर्चा काढून निषेध व्यक्त केला आहे.
यावेळी अल्पसंख्याक समाजातील व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवून निषेध मोर्चात सहभाग नोंदवला होता. ही घटना घडल्यानंतर त्याबाबत निषेध व्यक्त करत स्थानिक प्रशासनाशी चर्चा करण्यात आली.
त्यानंतर आंदोलकांनी उपोषण मागे घेतले. मात्र ज्यांनी हा प्रकार केला आहे, त्यांना तात्काळ अटक करावी अन्यथा आम्ही पुन्हा आंदोलन करु असंही नागरिकांनी सांगितले.
पाकिस्तानमध्ये हिंदूं समाजातील व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्यांना ते महागात पडत आहे. 2020 मधील एका अहवालानुसार, महागाईमुळे अनेक हिंदू कुटुंबं मृतदेह जाळण्याऐवजी दफन करत होती.
तर मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी 20 ते 25 हजार रुपये खर्चही करावा लागत असल्याचे अहवालात म्हटले आहे. तर मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी मृतदेहाचे अस्थिकलश गंगेत आणण्यासाठी भारतात येण्याचाही खर्च वाढत असल्याने हिंदू समाजातील अनेक लोकांवर आर्थिक बोजा वाढला आहे.
तर एका अहवालानुसार सांगण्यात आले आहे की, पाकिस्तानातील बहुतांश हिंदूंनी मृतदेह जाळण्याऐवजी त्यांचे दफन करण्यास सुरुवात केली आहे.
अहवालानुसार, सिंध, पंजाब आणि खैबर पख्तुनख्वामधील हिंदूंनी वाढत्या महागाईवरही प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे. वाढत्या महागाईमुळे आम्हाला भारतात येणं परवडत नसल्याचेही त्यांनी सांगितले.