नवी दिल्लीः रशिया आणि युक्रेनचे सुरू असलेल्या युद्धामुळे युक्रेनकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला आहे. त्यामुळे अनेक व्यक्तींकडून वेगवेगळ्या पद्धतीने त्यांना मदत करण्यात येत आहेत. त्याच प्रकारे हॉलिवूड अभिनेता आणि दिग्दर्शक शॉन पेन यांनी युद्धग्रस्त असलेल्या युक्रेनच्या राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांना त्याला मिळालेला ऑस्करच भेट दिला आहे. त्याचे कारण विचारले असता पेनने युक्रेनला आपला पाठिंबा दर्शवण्यासाठी ही भेट दिली असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
Sean Penn has given his Oscar to Ukraine – @ZelenskyyUa
Thank you, sir!
It is an honor for us. pic.twitter.com/vx2UfEVTds— Anton Gerashchenko (@Gerashchenko_en) November 8, 2022
रशियाच्या हल्ल्यानंतर अभिनेत्याने युक्रेनला दिलेली ही तिसरी भेट आहे. यावेळी अभिनेता शॉन पेन यांनी सांगितले की, युद्ध संपेपर्यंत हा पुरस्कार तुम्ही तुमच्या जवळ ठेवा.
आणि यावेळी त्याने युक्रेनच्या विजयाची आशाही व्यक्त केली आहे. त्यानंतर झेलेन्स्की यांच्या कार्यालयाने त्याचा हा व्हिडिओ शेअर केला आहे.
शॉन पेन यांनी झेलन्स्की यांची भेट घेत युद्ध ही भयंकर गोष्ट असल्याचे त्यांनी झेलन्स्की यांना सांगितले. यावेळी झेलेन्स्की यांनीही शॉन पेनचे आभार मानत तुमच्यामुळे मला लढण्यासाठी बळ मिळत असल्याचेही त्यांनी सांगितले.
पेन यांनी ऑस्कर पुरस्कार त्यांच्याकडे देताना ते म्हणाले की हा पुरस्कार गौरव तुमचा आहे तरीही पेन यांनी झेलेन्स्की यांच्याकडे मिळालेला पुरस्कार बहाल केला.
त्यानंतर झेलेन्स्की म्हणतात की आम्हाला जिंकायचेच आहे. त्यावर पेन म्हणतो की, जिंकल्यानंतर तो पुन्हा आणा. पेन यांच्या या कृतीमुळे झेलेन्स्की यांनी नंतरच्या एका पोस्टमध्ये लिहिले आहे.
शॉनने आपला ऑस्कर पुरस्कार आपल्या देशाच्या विजयावरील विश्वासाचे प्रतीक म्हणून दिला आहे. त्यामुळे हा त्याचा ऑस्कर युक्रेनमध्येच राहिल.
पेन यांनी केलेल्या गौरवाबद्दल पेनला झेलेन्स्की यांनी ऑर्डर ऑफ मेरिट ही पदवी प्रदान केली आहे. त्याचबरोबर युक्रेनला जगात लोकप्रिय करण्यासाठी अशा प्रामाणिक समर्थनासाठी आणि तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल त्यांनी त्यांचे आभार मानले आहेत.
याआधी युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी रशियासोबत शांततेबाबत चर्चा करण्याची शक्यता दर्शवली होती. यावेळी त्यांनी युक्रेनच्या सर्व ताब्यात घेतलेल्या जमिनी परत करणे, युद्धातील नुकसानीची भरपाई देणे आणि युद्धासारख्या चर्चेसाठीही त्यांनी अटींची रुपरेषा सांगितली आहे.