Helicopter Crashes: दोघांना शोधायला गेले आणि पाच जण मेले; जॉर्जियामधील हेलिकॉप्टर क्रॅशचा भयानक अपघात कॅमेऱ्यात कैद

| Updated on: Jul 29, 2022 | 9:23 PM

एपीएच्या स्थानिक ब्युरोने दिलेल्या वृत्तानुसार, जॉर्जियाच्या गुडौरी रिसॉर्ट परिसरात हेलिकॉप्टर दुर्घटना ग्रस्त झाले आहे. जॉर्जियन गृह मंत्रालयाच्या सीमा सुरक्षा दलाचे हे हेलिकॉप्टर होते. गुडौरी रिसॉर्ट परिसरातून बेपत्ता झालेल्या पॅराग्लायडर्सचा शोध घेण्यासाठी हे हेलिकॉप्टर गेले होते.

Helicopter Crashes: दोघांना शोधायला गेले आणि पाच जण मेले; जॉर्जियामधील हेलिकॉप्टर क्रॅशचा भयानक अपघात कॅमेऱ्यात कैद
Follow us on

जॉर्जिया : हेलिकॉप्टर क्रॅश(Helicopter Crashes) होतानाचा भयानक अपघात कॅमेऱ्यात कैद झाला आहे. जॉर्जिया( Georgia) देशात हे हेलिकॉप्टर क्रॅश झाले आहे. हवेत उडणारे हेलिकॉप्टर कोसळून दरीत पडल्याचे दिसत आहे. हे हेलिकॉप्टर बेपत्ता झालेल्या पॅराग्लायडर्सचा शोध घेण्यासाठी गेले होते. मात्र, यांचा थांगपत्ता लागण्याआधीच हे हेलिकॉप्टर क्रॅश झाले. या दुर्घटनेत हेलिकॉप्टरमध्ये असलेल्या पाच जणांचा मृत्यू झाला आहे. यानंतर बचाव पथकाच्या मदतीने हे हेलिकॉप्टर बाहेर काढण्यात आले. मात्र, हा अतिशय दुर्गम भाग असल्याने कोसळलेल्या हेलिकॉप्टरचा शोध घेताना बचाव पथकाला देखील अडचणींचा सामना करावा लागला.

पॅराग्लायडर्सचा शोध घेण्यासाठी गेले होते हेलिकॉप्टर

एपीएच्या स्थानिक ब्युरोने दिलेल्या वृत्तानुसार, जॉर्जियाच्या गुडौरी रिसॉर्ट परिसरात हेलिकॉप्टर दुर्घटना ग्रस्त झाले आहे. जॉर्जियन गृह मंत्रालयाच्या सीमा सुरक्षा दलाचे हे हेलिकॉप्टर होते. गुडौरी रिसॉर्ट परिसरातून बेपत्ता झालेल्या पॅराग्लायडर्सचा शोध घेण्यासाठी हे हेलिकॉप्टर गेले होते.

गुडौरी रिसॉर्टमध्ये अनेक पर्यटक येत असतात. रिसॉर्ट झोनमध्ये पर्यटक पॅराग्लायडींगचा देखील आनंद लुटतात. येथील डोंगरावरुन पॅराग्लायडिंग केले जाते. या रिसॉर्टमध्ये पॅराग्लायडसाठी गेलेले पर्यटक अचानक बेपत्ता झाला. त्यांचा काहीच संपर्क होत नसल्याने जॉर्जियन गृह मंत्रालयाच्या सीमा सुरक्षा दलाचे हेलिकॉप्टर त्यांच्या शोधासाठी पाठवण्यात आले.

हेलिकॉप्टर कोसळल्यानंतर मोठा स्फोट झाला आणि आग लागली

जेथून पॅराग्लायडिंग केले जाते तेथे हे हेलिकॉप्टर पर्यटकांचा शोध घेत होते. यावेळी ही दुर्घटना घडली. हेलिकॉप्टर नेमकं कोणत्या कारणामुळे क्रॅश झाले हे समजू शकले नसले तरी हेलिकॉप्टरचा पंखा येथील दगडावरील एका दरीला धडकला. यामुळे हे हेलिकॉप्टर कोसळले. हेलिकॉप्टर कोसळल्यानंतर मोठा स्फोट झाला आणि आग लागली. आगीचे लोळ उठल्याचे व्हिडिओत दिसत आहे.

हेलिकॉप्टरमधील पाच जणांचा मृत्यू

या हेलिकॉप्टरमध्ये दोघा पायलट सह रेस्क्यू करणारे तीन व्यक्ती असे पाच प्रवास करत होते. या दुर्घटनेत या पाचही जणांचा मृत्यू झाला आहे. दोघा पर्यटकांना वाचवण्याच्या नादात या पाच जणांचा मृत्यू झाला आहे.