चीनमध्ये पुन्हा हॉस्पिटल फुल्ल; कोरोनाच्या 5 वर्षानंतर या रोगाचे संक्रमण, लागणार लॉकडाऊन?

| Updated on: Jan 03, 2025 | 9:26 AM

China Mysterious Disease : चीनने पुन्हा एकदा जगाची चिंता वाढवली आहे. पाच वर्षांपूर्वी कोरोना महामारीने जगाला वेठीस धरले होते. आता चीनमध्ये एक गूढ आजाराचे प्रमाण वाढल्याचा दावा करण्यात येत आहे. सोशल मीडियावर याविषयी विविध दावे करण्यात येत आहेत.

चीनमध्ये पुन्हा हॉस्पिटल फुल्ल; कोरोनाच्या 5 वर्षानंतर या रोगाचे संक्रमण, लागणार लॉकडाऊन?
चीनमध्ये महामारी?
Follow us on

चीनमध्ये एका गूढ आजाराने थैमान घातले आहे. लहान मुलांसह ज्येष्ठ नागरिकांमुळे रूग्णालय पुन्हा फुल्ल झाले आहेत. या ठिकाणी गर्दी दिसत असल्याचा दावा सोशल मीडियावर करण्यात येत असल्याने जगाची चिंता वाढली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर याविषयीचे व्हिडिओ आणि छायाचित्र तेजीने व्हायरल होत आहेत. चीनमधील काही रुग्णालयात गर्दी दिसून येत आहे. चीनमधील कोरोना आजाराने संपूर्ण जगाला वेठीस धरले होते. चीनवर त्यावेळी जगभरातून टीका झाली होती. जगभरात लॉकडाऊन लागले होते. आता इन्फ्लुएंजा ए, मायकॉप्लाज्मा न्यूमोनिया आणि ह्यूमन मेटापनेयूमोवायरस (hMPV) या आजारांचे प्रमाण वाढल्याचा दावा करण्यात येत आहे. ही एक महामारी असल्याची चर्चा होत आहे. अर्थात जागतिक आरोग्य संघटना (WHO) आणि चीन सरकारकडून याविषयीची अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

चीनमध्ये श्वसनासंबंधीच्या आजारात लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येते. खासकरून रुग्णालयात लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांची गर्दी वाढली आहे. रोगप्रतिकार शक्ती कमी झाल्याने हा प्रकार होत असल्याचे समोर येत हे. पण हा संसर्गजन्य आजार असल्याने त्याचा प्रसार झपाट्याने वाढला आहे. त्याची लक्षण ही सर्दी-पडशा सारखी आहेत. यामध्ये ताप, खोकला, नाक वाहणे, श्वास घेताना धाप लागणे वा श्वास घेण्यास कष्ट पडणे अशी लक्षणं दिसत आहेत. चीन सरकार अथवा डब्ल्यूएचओने याविषयी कोणताही अलर्ट दिला नाही. हा आजार वातावरणातील बदलामुळे झाला की चीन सरकारने पुन्हा एकदा हलगर्जीपणा केला हे समोर आलेले नाही.

हे सुद्धा वाचा


खरंच आहे का महामारी?

समाज माध्यमांवर याविषयीचे व्हिडिओ आणि छायाचित्र व्हायरल होत आहे. चीनमधील अनेक दवाखाने सध्या अबालवृद्धांमुळे गजबजले आहेत. सध्या ही गर्दी अधिक दिसत असल्याचा दावा सोशल मीडियातून करण्यात येत आहे. अनेक तज्ज्ञांच्या मते, वातावरणातील बदलामुळे आणि थंडीच्या लाटेने चीनमध्ये आजार बळावले आहे. कोरोनानंतर अनेक लोकांची रोगप्रतिकार शक्ती कमी झाली आहे. अशावेळी वातावरण बदलानंतर सर्दी-पडशाचे प्रमाण वाढले आहे. इन्फ्लुएंजा ए, मायकॉप्लाज्मा न्यूमोनिया आणि ह्यूमन मेटापनेयूमोवायरस (hMPV) या आजारांचे प्रमाण वाढल्याचा दावा करण्यात येत आहे. अर्थात यापूर्वी हे आजार या देशात बळावले होते. हा नवीन आजार नसल्याचे सांगण्यात येत आहे.