भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनिता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे अंतराळातील आंतरराष्ट्रीय स्पेस स्थानकात अडकल्या आहेत. त्यामुळे त्यांना आता पुढील वर्षी आणता येणे शक्य होणार आहे. सुनिता विल्यम्स आणि त्यांचे अमेरिकन सहकाही अंतराळवीर बुच विल्मोर अनेक महिन्यांपासून अंतराळ स्थानकात अडकले आहेत. त्यामुळे अंतराळात अखेर अंतराळवीर किती दिवसांपर्यंत राहू शकतात ? याबाबत विज्ञान काय म्हणते ? हे पाहूयात…
अमेरिकन अंतराळवीर सुनिता विल्यम्स आणि बुच विल्मोर ५ जून रोजी अंतराळ स्थानकात प्रशिक्षण मोहिमेसाठी रवाना झाल होते. केवळ आठ दिवस तेथे राहून त्यांना पुन्हा पृथ्वीवर परत यायचे होते. परंतू स्टार लायनर या अंतराळ यानात बिघाड झाल्यामुळे सुनिता विल्यम्स आणि त्यांचा सहकाही बुच विल्मोर दोघे जण अंतराळ स्थानकात अडकून पडले आहेत.
सुनिता विल्मम्स आणि विल्मोर बुच यांची पृथ्वी वापसी आता फेब्रुवारी – मार्च २०२५ पर्यंत शक्य आहे. क्रु -९ मोहिमेंतर्गत इलॉन मस्क यांच्या ‘स्पेस एक्स’ कंपनीच्या अंतराळ यानातून त्यांना पृथ्वीवर परत माघारी आणले जाणार आहे. त्यामुळे सर्वसामान्याच्या मनात एक प्रश्न निर्माण झाला आहे की अखेर कोणताही व्यक्ती स्पेसमध्ये किती काळ सहिसलामत राहू शकतो. चला तर आपण पाहूयात कोणी किती काळापर्यंत अंतराळात जीवंत राहू शकतो…
सर्वसामान्यपणे अंतराळात जेव्हा कोणताही अंतराळवीर राहातो,तेव्हा त्याच्या मिशननुसार कालावधी ठरलेला असतो. परंतू काही कारणाने जर अंतराळात अंतराळवीर अडकून राहीला तर तो किती दिवस जीवंत राहू शकतो ? अंतराळवीर सुनिता विल्यम्स किती दिवस अंतराळात राहू शकतात? सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जून महिन्यांपासून अंतराळात अडकलेल्या सुनिता विल्यम्स ३०० ते ४०० दिवस अंतराळात आरामात राहू शकतात. त्यामुळे सध्या त्या अनेक महिने तेथे राहू शकतात.
अंतराळात सर्वाधिक काळ राहण्याचा विक्रम रशियाचा अंतराळवीर वालेरी पोल्याकोव्ह यांच्या नावे आहे. ते जानेवारी १९९४ ते मार्च १९९५ पर्यंत मीर अंतराळ स्थानकात सलग ४३७ दिवस म्हणजे एक वर्षांहून अधिक काळ राहीले होते.
भारतीय वंशाच्या सुनिता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बुच विल्मोर यांची पृथ्वी वापसी आता साल २०२५ मध्ये शक्य आहे. अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था नासाने त्यांना पृथ्वीवर आणण्याची योजना आखली आहे. ही योजना लवकरच पूर्ण केली जाणार आहे. नासाचे हे दोन अंतराळवीर स्पेसएक्स कंपनीच्या ड्रॅगन कॅप्सुलद्वारे पृथ्वीवर परत येणार आहेत.