सूर्यग्रहणाची आली तारीख, यंदाचं सूर्यग्रहण या तारखेला दिसणार, ‘रिंग ऑफ फायर’चा नजारा

| Updated on: Jun 27, 2024 | 4:28 PM

यावर्षीचे पहिले सूर्यग्रहण 8 एप्रिल रोजी अमेरिकेतून दिसले होते. हे सूर्यग्रहण खंग्रास सूर्यग्रहण होते.त्यामुळे काही वेळ अंधार पसरला होता.आता यावर्षीचे दुसरे सूर्यग्रहण घडणार आहे. हे सूर्यग्रहण कंकणाकृती असणार आहे. आकाशात 'रिंग ऑफ फायर' चा दुर्मिळ नजारा पाहायला मिळणार आहे. चला जाणून घेऊ कसे असणार हे सूर्यग्रहण

सूर्यग्रहणाची आली तारीख, यंदाचं सूर्यग्रहण या तारखेला दिसणार, रिंग ऑफ फायरचा नजारा
annular solar eclipse
Image Credit source: TV9MARATHI
Follow us on

वॉशिंगटन : खगोलशास्रात ज्यांना रस आहे त्यांच्यासाठी यावर्षी दोन महत्वाच्या खगोलीय घटनांचा नजारा पाहण्याची संधी होती.  पहिले सूर्यग्रहण अमेरिकेतून एप्रिल महिन्यातच अनुभवायला मिळाले. आता दुसऱ्या सूर्यग्रहणाची वाट पाहीली जात आहे. या वर्षीचे दुसरे सूर्यग्रहण आणि शेवटचे सूर्यग्रहण केव्हा आहे ? याचा उलगडा झाला आहे. तसेच हे सूर्यग्रहण कोठून पाहायला मिळणार आहे याची देखील माहीती मिळाली आहे. या वर्षींच्या सूर्यग्रहणाची तारीख 2 ऑक्टोबर असणार आहे. हे सूर्यग्रहण अमेरिकेतून एप्रिल महिन्याच दिसलेल्या खंग्रास स्वरुपात नसणार हे देखील स्पष्ट झाले आहे.

2 ऑक्टोबर रोजी असणारे सूर्यग्रहण एक कंकणाकृती सूर्यग्रहण असणार आहे. ज्यास ‘रिंग ऑफ फायर’ म्हटले जाते. कारण यावेळी आकाशात आपल्याला बांगडी सारखे तेजस्वी कंकणाकृती रुपात सूर्यमहाराजांचे रुप पाहायला मिळणार आहे. असे का होणार आहे हे आपण जाणून घ्यायला हवे. अंतराळात सूर्य स्थिर तारा आहे. तर पृथ्वी सूर्याभोवती फिरत असते. चंद्र पृथ्वीच्या भोवती परिक्रमण करीत असतो. त्याच बरोबर तो सूर्याची देखील प्रदक्षिणा करतो. अनेकवेळा फिरता फिरता जेव्हा चंद्र सूर्य आणि पृथ्वीच्या दरम्यान येतो तेव्हा सूर्यग्रहण घडते. त्यावेळी सूर्याचा प्रकाश आपल्यापर्यंत पोहचत नाही. त्यालाच सूर्यग्रहण म्हणतात. यावेळी चंद्राची सावली आपल्या पृथ्वीवर पडत असते.

कंकणाकृती सूर्यग्रहण म्हणजे काय ?

चंद्र जेव्हा पृथ्वीची प्रदक्षिणा करतो. त्यावेळी काही वेळा चंद्र पृथ्वीपासून दूर वर गेलेला असतो. केव्हा तो पृथ्वीच्या एकदम जवळ आलेला असतो तर कधी लांब गेलेला असतो. ज्यावेळी चंद्र पृथ्वीच्या जवळ असतो तेव्हा त्याचा आकार आपल्याला मोठा दिसतो. जेव्हा तो पृथ्वीपासून दूर असतो तेव्हा छोटा दिसतो. ज्यावेळी चंद्र पृथ्वीच्या नजीक असतो तेव्हा जर सूर्यग्रहण घडले तर चंद्र सूर्याला संपूर्ण झाकून टाकतो. त्यामुळे खंग्रास सूर्यग्रहण ( Total Solar Eclipse ) घडते. परंतू चंद्र जेव्हा पृथ्वीपासून दूर असतो तेव्हा त्याचा आकार छोटा असल्याने सूर्याचा मधला भागच झाकला जातो. आणि सूर्याच्या कडा आपल्याला पृथ्वीवरुन दिसतात. त्याला कंकणाकृती सूर्यग्रहण असे म्हटले जाते. कंकणाकृती सूर्य ग्रहणाला एन्यूलर सोलर एलिप्स ( Annular Solar Eclipse ) देखील म्हटले जाते.

2 ऑक्टोबरचे सूर्यग्रहण भारतात दिसणार ?

येत्या 2 ऑक्टोबर रोजी दिसणाऱ्या सूर्यग्रहण भारतात दिसणार का? तर याचे उत्तर आहे की हे कंकणाकृती सूर्यग्रहण केवळ दक्षिण अमेरिका खंड आणि पॅसिफिक महासागरात दिसणार आहे. या काळात चंद्र सूर्याचा 93 टक्के भाग व्यापाला जाणार आहे. आकाशात सुर्याचे कंकणाकृती संपूर्ण रिंग 7 मिनिटे 25 सेकंद दिसेल. अर्जेंटिना आणि चिलीच्या काही ठिकाणी हे सूर्यग्रहण पाहता येणार आहे. ते उर्वरित खंडात अंशतः दिसेल असे खगोल तज्ज्ञांचे म्हणणे आहे.