नूर सुल्तान : तुम्ही अनेक ज्वालामुखींबाबत ऐकलं असेल आणि बघितलेही असतील (Ice Volcano Emerged In Kazakhstan). पण, तुम्ही कधी बर्फाचा ज्वालामुखी पाहिला आहे का? कझाकिस्तानच्या अल्माटी येथे हा बर्फाचा ज्वालामुखी पाहायला मिळतो आहे. कझाकिस्तानच्या अल्माटी येथे एक रहस्यमयी पद्धतीने 45 फुट उंच बर्फाचा डोंगर उभा राहिला. याला बर्फाचा ज्वालामुखी म्हणतात (Ice Volcano Emerged In Kazakhstan).
केगन आणि शरगानक या गावांच्या मधोमध बर्फाने झाकलेल्या मैदानात या डोंगरातून पाणी निघत आहे. हे पाणी बाहेर येताच त्याचं रुपांतर बर्फात होत आहे. याच कारणामुळे याची उंची वाढत आहे.
नूर सुल्तान येथून चार तासाच्या अंतरावर असलेल्या या नैसर्गिक आश्चर्याला पाहाण्यासाठी रक्त गोठवणाऱ्या थंडीतही शेकडो पर्यटक याठिकाणी गर्दी करत आहेत. गेल्या वर्षी अमेरिकेच्या मिशीगन तलावातही अशा आकृत्या उभ्या राहिल्या आहेत. पण, त्या एका व्यक्तीच्या उंची जितके होते. पण, हे पहिल्यांदा असं झालं आहे की या बर्फाच्या पहाडाची उंची इतकी वाढली आहे.
बर्फाचा ज्वालामुखी आसपासच्या जमीनीच्या हालचालीमुळे बर्फाचा डोंगर तयार होतो. त्यासाठी ज्वालामुखी सारखी परिस्थिती पाहिजे. जसे कमी तापमान आणि तीन फुटांपर्यंत बर्फ जमा होतो. धरतीवरील हालचालीमुले गरम पाणी जेव्हा पृष्ठभागावर कारंजे उसळतात. पण, थंड वाऱ्यामुळे या पाण्याचं रुपांतर बर्फात होतं आणि हा बर्फाचा ज्वालामुखी तयार होतो (Ice Volcano Emerged In Kazakhstan).
मासेमारी करणाऱ्याला सापडला दुर्मिळ नारंगी मोती, किंमत ऐकून भुवया उंचावतीलhttps://t.co/y8lgFAQZkB#MeloSnail #OrangePearl
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 8, 2021
Ice Volcano Emerged In Kazakhstan
संबंधित बातम्या :
Photos : मानवी इतिहासाची दिशा बदलणारे जगातील 10 आंदोलनं कोणती? वाचा सविस्तर…
जगातील पहिलं असं गाव जिथे फक्त महिलांचं राज्य, पुरुषांना पाय ठेवण्यासही मनाई