जगात अमेरिकेला टक्कर देणारा देश म्हणून चीनकडे पाहिले जात आहे. चीन आपल्या अक्राळ विक्राळ नौदलाच्या बळावर समुद्रावर हुकूमत गाजवत आहे. हिंद प्रशांत महासागरात तर चीन अक्षरश: दादागिरी करीत आहे. परंतू एका अमेरिकन थिंक टँकने एक अहवाल सादर केला आहे. या अहवालामुळे जगाला धक्का बसला आहे. Rand Corp ने आपल्या अहवालात सनसनाटी दावा केला आहे. चीनची आर्मी ‘PLA’ युद्ध लढण्यापूर्वीच हरलेली आहे. आज जर भारत आणि चीन युद्ध झाले तर PLA आर्मीला ही लढाई अवघड जाणार आहे. याच कारणामुळे चीनच्या पिपल्स लिबरेशन आर्मीला ( PLA ) उभारणी देण्याच्या कामाला चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग लागले आहेत.
अमेरिकन थिंक टँकने आपला अहवाल सादर केला आङे. या अहवालात जगातील दोन सर्वाधिक मोठी लोकसंख्या असलेले देश जर भिडले तर चीनचा पराभव होऊ शकतो. कारण चीनची आर्मी अनफिट आहे. चीनची कम्युनिस्ट पार्टी ‘सीसीपी’चा उद्देश्य चीनी सैन्याला मजबूत राखण्याचा आहे. कारण सत्तेवर पकड कायम राहाण्यासाठी त्यांना आर्मीची गरज आहे. त्यामुळे बाहेरील शत्रूंशी लढण्याची पीएलएची तयारी असल्याचे नजरेला येत नाही.
अहवालाचे लेखक Timothy R. Heath यांनी दावा केला आहे की पीएलएचा संपूर्ण फोकस हा अध्यक्ष शी जिनपिंग आणि त्यांच्या पक्षाला सत्तेबाहेर खेचण्याकडे लागला आहे. चीनी सैन्याचे आधुनिकिकरण केले जात आहे.त्यामागे चीनच्या सरकारला स्थिर राखण्याचा प्रयत्न सुरु आहे.
चीनच्या सैन्याला ‘पीएलए’ म्हणजे पिपुल्स लिबरेशन आर्मी म्हटले जाते. पीएलए याच्या प्रशिक्षणाचा ४० टक्के वेळ हा राजकीय कुरघोड्यांवर खर्च होतो आहे. जो वेळ युद्धातील निपुणता आणि प्रावीण्य मिळवायला खर्च व्हावा तोच वेळ आता सत्तेतील ताकद कायम राखण्यास खर्च केला जात आहे. पीएलएचा वेळ युद्धाला सज्ज राहण्यापेक्षा अध्यक्ष शी जिनपिंग यांची खुर्ची वाचविण्यात चालला आहे असे तिमोथी हीथ यांचे म्हणणे आहे.
जर आज अमेरिका आणि चीनचे युद्ध झाले तर ते पारंपारिक युद्ध नसेल असे म्हटले जात आहे. तर काही तज्ज्ञ या अहवालाच्या विरोधात आहेत. त्यांचे म्हणणे आहे की अध्यक्ष शी जिनपिंग यांनी सैन्याला तैवानला कोणत्याही परिस्थितीत लक्ष्य करण्याचे सांगण्यात आले आहे. चीनचा त्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरु आहे.
चीनकडे युद्धासाठी अत्याधिनिक शस्रास्रे देखील नाहीत असा दावा या अहवालात केला आहे
चीनचे सैन्य बहुतांश वेळा युद्धात आपल्या अत्याधुनिक शस्रास्रांचा वापर करण्यात अपयशस्वी ठरली आहे.
त्यामुळे जर थेट युद्ध झाले तर चीन आपली अत्याधुनिक शस्रे वापरु शकणार नाही असाही दावा लेखक तिमोथी हीथ यांनी केला आहे
चीनचे सैनिक किती डरपोक आहे हे गलवान व्हॅलीत साऱ्या जगाने पाहीले आहे. त्यावेळी त्यांनी माघार घेतली होती. चीनी सैनिक डरपोक तर आहेतच शिवाय भ्रष्टाचारी देखील आहे. चीनच्या आर्मीतील भ्रष्टाचार वरच्या अधिकाऱ्यांपर्यंत पोहचलेला आहे. चीनी सैन्यातच सध्या मनुष्यबळाची कमतरता आहे असेही या अहवालात म्हटले आहे.
चीनच्या लष्करातील सक्रीय सैनिकांची संख्या 20 लाखाहून अधिक
चीनजवळ 10 लाखाहून अधिक राखीव सैनिक आहेत
चीनकडे 6 लाख 60 हजार निमलष्करी दल आहे
जगातील 145 शक्तीशाली देशांच्या यादीत चीनचा तिसऱ्या स्थानावर आहे
चीनकडे 6800 रणगाडे आणि 1 लाख 44 हजार 17 आर्मर्ड व्हीईकल आहेत
चीनी आर्मीजवळ रॉकेट लॉन्चरांची संख्या सुमारे 2750 इतकी आहे